आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीचे रविवारी सरकारविरोधात 'हल्लाबोल' आंदोलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- केंद्र आणि राज्य सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. या नाकर्ते सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात आंदोलने सुरु केली आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येत्या रविवारी (ता. 26) दुपारी तीन वाजता  'हल्लाबोल' आंदोलन करणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली. हे आंदोलन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली होईल असेही त्यांनी सांगितले.  

 

आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार विलास लांडे, महिला शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर, संजय वाबळे, फजल शेख,  नंदा यादव, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे आदी उपस्थित होते.

 

केंद्र आणि राज्य सरकार सर्वंच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. फसलेली नोटबंदी, पूर्णतः फसलेली कर्जमाफी, वाढती महागाई, बिघडलेली कायदा-सुव्यस्था, लोडशेडिंग, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, शिष्यवृत्तीचे प्रश्न, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण असे विविध प्रश्न सरकाराला सोडविता आले नाहीत. निवृत्त शिक्षक, शिक्षक यांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, सरसकट शास्तीकर माफीच्या घोषणेचे काय झाले?, स्मार्ट सिटीचे पुढे काय झाले. रिंगरोड रद्द करावा, रेडझोनची हद्दी कमी करण्यात यावी. मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी. शहरातील अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा याचा जाब विचारण्यासाठी 'हल्लाबोल' आंदोलन करण्यात येणार असल्याचे संजोग वाघेरे यांनी सांगितले. 

 

रविवारी दुपारी तीन वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. हनुमान मंदीर, आकुर्डी गावठाण, ते तहसील कार्यालय प्राधिकरण येथे धडकणार असून मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...