आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात शंभर जागांवर अाघाडी; ६२ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे महापालिकेतील सत्ता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी कांॅग्रेस व कांॅग्रेसच्या नेत्यांनी चर्चेअंती अाघाडी करण्यास अनुकुलता दर्शवली अाहे.  यापूर्वी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला दुरावा बाजूला ठेवत गुरुवारी कांॅग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. शंभर जागांवर अाघाडीने तर उर्वरित ६२ जागांवर मैत्रीपूर्ण लढतीने निवडणूक लढविण्याचा निर्णय दाेन्ही पक्षातील नेत्यांनी घेतला अाहे.

कांॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांनी बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी कांॅग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी फाेनवर चर्चा केली. त्यानंतर गुरुवारी अजित पवार, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण अाणि कांॅग्रेसचे नेते विश्वजित कदम, शहराध्यक्ष अामदार रमेश बागवे यांच्यात तातडीने बैठक घेण्यात अाल्याने अाघाडीच्या अाशा पल्लवित झाल्या अाहेत. यापूर्वी कांॅग्रेसने राष्ट्रवादीकडे ६७ जागांची मागणी केली असून राष्ट्रवादीने मात्र त्यांना ६० जागा देण्याची तयारी दर्शवली. मात्र, दाेन्ही पक्षांत एकमत न झाल्याने त्यांच्यातील चर्चा थांबली हाेती. मात्र गुरुवारी अाघाडीच्या निर्णयावर शिक्कामाेर्तब झाले.

दरम्यान, मागील निवडणुकीत २०१२ मध्ये कांॅग्रेस व राष्ट्रवादी कांॅग्रेस पक्ष स्वतंत्ररीत्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले हाेते. यामध्ये राष्ट्रवादीला ५१ जागा तर कांॅग्रेसला २८ जागा मिळाल्या हाेत्या. निवडणुकीनंतर पालिकेत बहुमत मिळविण्यासाठी दाेन्ही कांॅग्रेस एकत्र येऊन राष्ट्रवादीचा महापाैर तर कांॅग्रेसचा उपमहापाैर झाला. शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांची युती असूनही मागील वेळी ते सत्ता स्थापनेपर्यंत पाेहाेचू शकले नव्हते. मात्र अाता राष्ट्रवादी अाणि कांॅग्रेस अाघाडीने लढण्याच्या तयारीत असून शिवसेना- भाजप मात्र स्वबळावर निवडणुकीला सामाेरे जात अाहेत. पुणे शहरातील सर्वच अामदार भाजपचे असल्यामुळे पक्षाची ताकद वाढली असून, त्याचा फायदा महापालिकेत हाेईल, असा दावा पक्षातर्फे केला जात अाहे.

अशाेक चव्हाणांच्या भेटीला कदम, बागवे मुंबईत
कांॅग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गुरुवारी सुमारे दाेन तास बैठक झाल्यानंतरही अाघाडीचा निर्णय जाहीर करण्यात अाला. जिथं एकमत तिथं अाघाडी, िजथं एकमत नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत असा सामंजस्य मार्ग चर्चेतून काढण्यात अाला.  दरम्यान, पुणे कांॅग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे अाणि  युवक कांॅग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम हे कांॅग्रेस उमेदवारांच्या नावावर शिक्कामाेर्तब करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांच्या भेटीकरिता मुंबईला रवाना झाले. 
बातम्या आणखी आहेत...