आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Candidate Sujata Tekawade Win Byelection Of Pcmc

पिंपरी-चिंचवड: प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादीच्या सुजाता टेकवडेंची 631 मतांनी बाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या काळभोर-मोहननगरमधील प्रभाग क्र. 26-अ मध्ये रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुजाता टेकवडे यांनी विजय खेचून आणला आहे. टेकवडे यांनी शिवसेना व भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला. सुजाता टेकवडे यांना 3486 मते मिळाली तर शिवसेनेच्या विजय गुप्ता यांना 2855 मते मिळाली. अखेर टेकवडे यांनी 631 मतांनी विजय मिळवला. भाजपचे गणेश लंगोटे तिस-या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना 2002 मते मिळाली. अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या या पोटनिवडणुकीत अखेर राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. टेकवडे यांची चार महिन्यापूर्वी हत्या झाली होती. टेकवडे यांची दुर्देवी हत्या झाल्याने व आगामी महापालिका निवडणुकीसाठी केवळ 8-10 महिनेच राहिले असल्याने अविनाश टेकवडे यांच्या पत्नी सुजाता यांना बिनविरोध निवडून द्यावे अशी इच्छा राष्ट्रवादीने विरोधी पक्षांकडे व्यक्त केली होती. मात्र, विरोधकांनी त्यास नकार देत निवडणूक घेण्यास भाग पाडले. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप-शिवसेनेने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अखेर राष्ट्रवादीने आपली जागा कायम राखली.
रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत 46 टक्के मतदान झाले होते. एकून 8 हजार 446 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात सुजाता टेकवडे यांना 3486, शिवसेनेच्या विजय गुप्ता यांना 2855 तर भाजपच्या गणेश लंगोटेंना 2002 मते मिळाली. काँग्रेसने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला तर मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
पुढे पाहा, कोणाला कशी मिळाली मते....