आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार हे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान- राहुल बजाज यांची स्तुतीसुमने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामतीतील कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन करताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, शरद पवार, अजित पवार व इतर पदाधिकारी... - Divya Marathi
बारामतीतील कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन करताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, शरद पवार, अजित पवार व इतर पदाधिकारी...
बारामती- शरद पवार हे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी पवारांवर स्तुतीसुमने उधळली. तर, बारामतीसारखा देशात 100 ठिकाणी विकासकेंद्रे बनली तर देश सर्वोत्तम बनेल असे वक्तव्य अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केले.
विद्या प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कॉलेजच्या नामकरण सोहळा पार पडला. विद्या प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कॉलेजचे आता यापुढे कमलनयन बजाज इन्सिस्ट्युट ऑफ इंजिनिअरींग अॅंड टेक्नालॉजी असे नामकरण करण्यात आले. त्याआधी आज सकाळी दहा वाजता बारामतीतील कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन केले.
आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामतीत पाहुणचार केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशाचे अर्थमंत्री अरूण जेटली यांचा बारामतीतील आपल्या गोविंद बाग घरी पाहुणचार केला. अर्थमंत्री जेटली यांचे काल रात्री बारामतीत आगमन झाले. त्यानंतर ते थेट पवारांच्या घरी भोजनाला व मुक्कामाला पोहचले.
कृषी महाविद्यालय इमारत उद्घाटनप्रसंगी पवार यांनी शेतक-यांचे प्रश्न मांडले व देशाचे अर्थमंत्री या नात्याने आपण त्यात लक्ष घालावे अशी विनंती जेटली यांच्याकडे केली. पवार म्हणाले, सध्या ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. पाण्याची कमतरता दिवसेंदिवस भासत आहे. त्यामुळे देशातील साखर उद्योग संकटात आहे. यावर उपाययोजना शोधल्या पाहिजेत. ऊसाचा दर व साखरेचा दर यात एकवाक्यता हवी. शेतक-यांना त्यांच्या घामांचा पैसा मिळालाच हवा तरच हा उद्योग टिकेल. पाण्याची कमतरता लक्षात घेऊन दीड महिन्यानंतर पाण्याला येणा-या ऊसाच्या वाणाची लागवड केली पाहिजे. हे वाण इंडोनेशियात विकसित करण्यात आले आहे. त्याची मी पाहणी केली आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाने त्यावर बंदी घातली आहे. केंद्रातील मोदी सरकारने यावरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भारत कृषीप्रधान देश आहे. देशाच्या जीडीपीत शेती घटकाचा साधारणपणे निम्मा वाटा राहिला आहे. तो तसाच कायम राहिल्यास देशाची प्रगती झपाट्याने राहील, असे पवारांनी सांगितले.
अर्थमंत्री अरुण जेटलींनी शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळली. विकासाच्या दृष्टीकोनाने पवारसाहेब हे बारामतीचे 'ग्रँडफादर' असल्याचे प्रमाणपत्र दिले तर, बारामतीचा दौरा माझ्यासाठी शिकण्याचा चांगला अनुभव आहे, असे सांगत येथील पवारांच्या विविध संस्था व विकास कामाची स्तुती केली. पवारांच्या मागणीला जेटलींनी सकारात्मक प्रतिसाद देताना देशाचा विकास व्हावा ही आमच्या सरकारचा पहिलाच प्राधान्यक्रम असल्याचे सांगितले. शेती व शेतकरी पुढे गेला तर देश पुढे जाईल याची आम्हाला कल्पना आहे. पवारसाहेबांनी जे मुद्दे मांडले त्यावर नक्कीच विचार होईल. कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान व अनुभव मोठा आहे असेही जेटलींनी सांगितले.
पुढे वाचा, आठ महिन्यापूर्वी मोदींनी घेतला होता पवारांचा बारामतीत पाहुणचार...
बातम्या आणखी आहेत...