आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • NCP Chief Sharad Pawar Says NCP Not In Oppose Of Reservation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धनगर आरक्षणाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, पवार म्हणाले, आदिवासींचे हक्कही शाबूत ठेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) समावेश करण्याच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचा जोरकस प्रचार ऐन निवडणुकीच्या तोंडावर केला जात असतानाच आरक्षणाची ही मागणी उचित ठरवत या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे, असे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी जाहीर केले.

कारण नसताना आदिवासी व धनगर यांच्यात विसंवाद निर्माण झाला. काही लोकांनी धनगरांना तिसर्‍या सूचीत घालावे असे मत मांडले. त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही. एक स्वतंत्र सूची करावी किंवा धनगरांना सूची क्रमांक दोनमध्ये समाविष्ट करावे, असे आमचे मत आहे.
आदिवासींप्रमाणेच धनगरांनाही आरक्षण मिळावे, अशी मागणी आपण पंतप्रधानांनाकडे केली आहे. हे आरक्षण देताना आदिवासींच्या हक्कांना धक्का लागू नये. संसदेत आपला पक्ष या विषयाच्या बाजूने मतदान करेल, असे पवार म्हणाले.

जागावाटपाबाबत लवचिकता : आगामी विधानसभा निवडणुकीत 144 जागांचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने सोडल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. जागांच्या संख्येविषयी आमचा आग्रह नाही. जागावाटपाबाबत काही कमी-जास्त करावे लागल्यास व्यापक हिताचा विचार करून आवश्यक तेथे लवचिक भूमिका घेऊन काही जागा सोडण्याची आमची तयारी आहे. या संदर्भात 19 ऑगस्ट रोजी दिल्लीत बैठक होणार असल्याचे पवार म्हणाले.
स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा
स्वतंत्र विदर्भ ही लोकेच्छा असेल, तर त्याचे प्रतिबिंब येत्या विधानसभा निवडणुकीत निकालांमध्ये उमटलेले दिसेल. ते जर विदर्भाचे वेगळे राज्य असावे, या मताचे असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असेल, असे शरद पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.