आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह 5 जणांना सट्टा लावताना अटक, निगडी पोलिसांची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख. - Divya Marathi
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख.
पुणे- पिंपरी-चिंचवडमधील चिखली येथे सट्टा लावत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. तामिळनाडू प्रिमीअर लीग क्रिकेट स्पर्धेवर हे सर्व जण सट्टा लावत होते. एका 3 मजल्याच्या बिल्डींगमध्ये हा प्रकार सुरू होता. या कारवाईत 2 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
 
मित्तल बिल्डिंगमधील एका फ्लॅटमध्ये सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी पहाटे या बिल्डिंगवर छापा टाकून राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांच्यासह 5 जणांना अटक केली. त्यांच्याकडून सट्टा लावण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, लॅपटॉप, मोबाईल, रोख 53 हजार 500 रुपयांसह एकूण 2 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमध्ये जावेद रमजान शेख (वय 47, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) नवीन भगवान मित्तल (वय 43, चिखली), राकेश नेमिचंद मेहता (वय 37 रा. बालाजीनगर, धनकवडी), प्रवीण शिवाजी पवार (वय 36, रा. दत्तवाडी, आकुर्डी) आणि जाकीर मस्तान शेख (वय 29, रा. विद्यानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील तपास निगडी पोलिस करीत आहेत. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...