आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजितदादांच्या पिंपरीला भाजपकडून खिंडार राष्ट्रवादीसह शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांचा भाजप प्रवेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच, “राष्ट्रवादी’ संलग्न दोन अपक्ष आणि शिवसेना व मनसेच्या प्रत्येकी एका नगरसेवकासह एकूण नऊ विद्यमान नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी भाजपत प्रवेश केला. आमदार महेश लांडगे यांच्या सुमारे ७० समर्थकांनीही या वेळी भाजपत प्रवेश केला. त्यात अनेक माजी नगरसेवक व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हा घाऊक प्रवेश अजित पवार यांना जोरदार धक्का मानला जात आहे

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून आमदार महेश लांडगे यांनी हाती घेतलेल्या ‘भोसरी व्हिजन- २०२०’ या अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अमर साबळे, संजय काकडे, भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, भाजपचे संघटनमंत्री रवी अनासपुरे या वेळी उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर गेली पंधरा वर्षे पिंपरी-चिंचवड शहरावर अजित पवार यांनी राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र, गेल्या दोन वर्षांत “राष्ट्रवादी’चे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यापासून अनेक पदाधिकारी, नगरसेवक यांनी “राष्ट्रवादी’शी फारकत घेत भाजपशी जवळीक साधली आहे. सोमवारी यात ५ नगरसेवकांची भर पडली. दरम्यान, येत्या काळात “राष्ट्रवादी’मधल्या आणखी काही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रवेश करणाऱ्यांची प्रचंड संख्या पाहून “तिकडे कोणी शिल्लक राहिले की नाही?’ असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला.
पुढे वाचा... मुख्यमंत्री काय म्हणाले
बातम्या आणखी आहेत...