आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-यांना कर्जमाफी न दिल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही- अजित पवारांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 बारामती- तीन वर्षांत राज्यावरील कर्जाचा डोंगर दीड लाख कोटींवरून तीन लाख कोटींवर नेणाऱ्या राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३५ हजार कोटी रुपये नाहीत. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. आम्हीदेखील सरकारच्या भूमिकेत होतो. कष्टकरी कामगार शेतकऱ्यांची आंदोलने मोडून काढण्याचा उद्योग सरकार करत आहे. काही शेतकऱ्यांमुळे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी वेठीस धरले जात आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी दिला. पवार बारामती तालुक्यातील नवनिर्वाचित १३ ग्रामपंचायत सरपंच सदस्यांचा सत्कारप्रसंगी बोलत होते. 
 
पवार म्हणाले, सध्या शेतीमालाला भाव नाही, निसर्गाच्या कृपेमुळे विहिरीत पाणी आहे, मात्र वीज तोडल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला असताना सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी चालढकल करत आहे. चुकीच्या पध्दतीने कर्जमाफी मिळवणाऱ्या दोन-तीन टक्के शेतकऱ्यांसाठी संपूर्ण शेतकरी वर्गाला वेठीस धरले जात आहे, असा आरोपही पवार यांनी केला. 
 
सदाभाऊ खोतांवर टीका-
 
ऊसदरासाठी आंदोलन करून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मागणाऱ्या सदाभाऊ खोतांना आता ऊसदराचा आकडा हा मटक्याचा आकडा वाटतो आहे. या लोकांना कधी संस्था काढून ती चालवण्याची अक्कल आहे का? अशी टीकाही पवार यांनी खोत यांचे नाव घेता केली. 
 
सगळीकडेच खड्डे, किती फोटो काढणार?-
 
सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या अावाहनानुसार रस्त्यावरील खड्ड्यांचा फोटो सेल्फी काढून पाठवला. सुप्रियाने मलाही खड्ड्यांचे फोटो काढण्याचे अावाहन केले आहे. राज्यात रस्त्यांवर इतके खड्डे पडलेत की कोणत्या-कोणत्या खड्ड्याचा फोटो काढून पाठवणार, असा सवालही त्यांनी केला. 
बातम्या आणखी आहेत...