आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Leader Ajit Pawar Wrote A Letter To Maharashtra People

मला माफ करा, \'तो\' विषय सारखा उकरून काढू नका- अजितदादांचे जनतेला पत्र, वाचा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- गेल्या वर्षी माझ्या तोंडातून अनावधाने वादग्रस्त वक्तव्य आले होते. माझी चूक मला मान्य आहे. यासाठी राज्यातील जनतेची मी अनेकदा माफी मागितली आहे. आता सारखा तोच तोच विषय उकरून काढून माझी बदनामी करू नका. निवडणुकीच्या काळात कृपया कमरेखाली वार करू नका. एक वर्षापूर्वीचा विषय माध्यमे वारंवार उकरून काढत आहेत. टीकेसाठी दुसरा कोणताच मुद्दाच मिळत नसल्याने त्या एकाच गोष्टीबद्दल मला लक्ष्य केले जात आहे, अशी खंत व्यक्त केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी.
इंदापूरमध्ये गेल्या वर्षी अजितदादांनी केलेल्या वक्तव्याचा माध्यमांत व जनतेत सारखा उल्लेख होत आहे. त्यामुळे अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचसाठी अजित पवारांनी जनतेला पत्र लिहताना माध्यमांना दोन शब्द सुनावले आहेत. तर, अजितदादांनी थेट जनतेशी एका पत्राद्वारे जो संवाद साधलाय त्यात नेमके काय म्हटलंय अजितदादांनी वाचा सविस्तर,
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना नमस्कार,
राजकीय आणि सामाजिक जीवनात वावरताना अनेकदा कौतुक आणि टीका यांचा चढ-उतार येतच असतो. या परिक्रमेत एखादा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये असा येतो की, एक तर तो तुम्हाला खूप आनंद देऊन जातो किंवा दुःखाच्या वेदनाही देऊन जातो. माझ्याही बाबतीत तेच घडलं. माझ्या आयुष्यातले जे काही थोडे फार वाईट दिवस असतील, त्यातला हा सर्वात मोठा वाईट दिवस होता असं मी मानतो. अर्थातच याला कुणीही जबाबदार नव्हतं. याला मीच माझा कारणीभूत होतो आणि हे मान्य करताना माझ्या मनात कोणत्याही प्रकारची कटुता नाही.
शनिवार 6 एप्रिल 2013 हा माझ्या आयुष्यातला विचारांचा वेध घेणारा दिवस. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथे माझी जाहीर सभा होती. त्यापूर्वीचा काळ हा राज्यातील काही भागांतील तीव्र दुष्काळाचा होता. माझ्यासह सर्वच चिंतातूर होते आणि अनेक दिवस आम्ही या दुष्काळाचं निवारण कशा पद्धतीनं करता येईल, यावर दिवसरात्र काम करत होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, माझ्या घरामध्येसुद्धा मी प्रत्येकाला पाणी वापरताना काळजी घेण्याच्या सूचना देत होतो. पूर्वी घरी कुणीही आलं की संपूर्ण ग्लासभर पाणी दिलं जायचं आणि अनेकदा उपस्थित पाहुणे ते पाणी पूर्णपणे प्यायचेही नाहीत. अर्थातच उर्वरीत पाणी आपण उष्टं म्हणून फेकूनच देतो. मात्र आम्ही कटाक्षानं एका गोष्टीची घरापासूनच सुरुवात केली की, घरी आलेल्या प्रत्येक माणसाला पाणी देताना अर्धा ग्लासच भरून द्यावा आणि त्यानं जर परत पाणी मागितलं, तर ते द्यावं. माझ्या बंगल्यातल्या शासकीय आणि खासगी गाड्या धुणंसुद्धा मी बंद करून टाकलं होतं. हे सगळं सांगताना यातून कोणत्याही प्रकारची सहानुभूती मिळावी, असा हेतू नाही. तर या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मला माझ्यापासून सुरुवात करून जे काही करणं शक्य असेल, ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.
अजित पवारांनी आणखी काय-काय भावना व्यक्त केल्या आहेत... वाचा सविस्तर...