आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला खिंडार, पिंपरी-चिंचवडमधील पानसरे काँग्रेसमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष व पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष आझम पानसरे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रामराम ठोकला. ग्राहक कल्याणसह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असून, काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याची घोषणा पानसरे यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले असून, आधीच गटा-तटात विखुरलेल्या पक्षाला लोकसभा निवडणूकीत याचा मोठा फटका बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आझम पानसरे यांनी पक्षाला रामराम ठोकून मागील पाच वर्षातील आपल्या मनातील खदखद अखेर बाहेर काढली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या पानसरे यांचा शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी सुमारे 80 हजार मतांनी पराभव केला होता. या पराभवाला राष्ट्रवादीतील नेते व आमदार लक्ष्मण जगताप कारणीभूत असल्याचे त्यांनी वारंवार पक्षनेतृत्त्वाला लक्षात आणून दिले होते. तरीही पक्षनेतृत्त्वाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने पानसरे नाराज होते.
गेल्या दोन वर्षापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पक्षातील त्यांच्या समर्थकांनी समेट घडवून आणली होती. त्यावेळी त्यांना मंत्रिपदाच्या दर्जाचे ग्राहल कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पानसरे यांना अजित पवारांनी डावलल्याचे दिसून आले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. तेथे पानसरे यांच्या समर्थकांना संधी न देता पक्षाच्या नेत्याचा पराभव करणा-या लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांचीच स्थायी समिती, शिक्षण मंडळ व विविध समित्यावर वर्णी लागली. पिंपरी-चिंचवड शहरावर अजित पवारांचे एकतर्फी वर्चस्व आहे. शरद पवार किंवा सुप्रिया सुळे जराही येथे येत नाहीत. एखाद्या बड्या प्रकल्याचे, योजनेचे उद्घाटन असेल तरच त्यांची हजेरी असते. त्यामुळे या सर्व घडामोडीमागे अजित पवारांची बंडखोर लक्ष्मण जगतापांना साथ आहे असा आरोप पानसरेंचा आहे.
पानसरे हे शरद पवारांचे निकटवर्तिय आहेत. त्यामुळे अजित पवारांनी पानसरे यांचे शहराध्यक्षपद काढून आपले कट्टर समर्थक योगेश बहल यांच्याकडे हे पद दिले तर, महापौरपद विलास लांडे यांच्या पत्नीकडे दिले. मात्र इतर महत्त्वाच्या विविध समित्यावर जगताप गटाचे वर्चस्व आहे. आता लक्ष्मण जगताप यांना जिंकून येण्याची क्षमता या निकषानुसार मावळमधून लोकसभेची उमेदवारी पक्षाने देऊ केली आहे. त्यामुळे पानसरे दुखावले आहेत. ज्या व्यक्तीने पक्षाचा उमेदवार गेल्यावेळीच पाडला त्यालाच आता जर पक्ष उमेदवारी देत असेल तर आपल्यातील कार्यकर्ता दुखावला जात आहे. आता या पक्षात काम करण्यात रस उरला नाही त्यामुळे आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
लक्ष्मण जगतापांना उमेदवारी तरीही राष्ट्रवादी जिंकणे महाकठीणच काम, वाचा पुढे...