आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीचे नेते व माजी खासदार बापूसाहेब थिटे यांचे पुण्यात निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार आणि महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे (वय 79) यांचे आज सकाळी पुण्यामध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. थिटे हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जायचे. शिरूर तालुक्यातील केंदूर गावचे असलेले थिटे यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आज दुपारी त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात येतील.
कायद्याची पदवी घेतलेल्या थिटे यांनी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, बारामतीचे खासदार आदी पदांसह राज्याचे गुहमंत्रीपदही भूषविले. थिटे यांनी बाणेर येथे श्री छत्रपती संभाजी शैक्षणिक संस्‍था सातारा या नावाने व्यवसायिक प्रशिक्षण संस्था सुरु केली. सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, तसेच तालुक्यातील अनेक संस्थेत विविध पदांवर काम केले. शिरुरमध्ये रांजणगाव एमआयडीसीची मुहूर्तमेढ करुन या एमआयडीसीचे ते प्रणेते झाले. राजकारणासोबतच बापूसाहेब सहकारी क्षेत्रातही कार्यरत होते.
थिटे यांच्या निधनाबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केले आहे. सुळे यांनी थिटे यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले की, बापूसाहेब हे शरद पवार साहेबांचे जवळचे सहकारी होते. पवारसाहेब दिल्लीतून राज्यात परत जबाबदारी सांभाळण्यास आल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व बापूसाहेबांनी केले होते. शिरुर तालुक्याच्या प्रत्येक भागात पाण्याची व्यवस्था करुन हा भाग सुजलाम सुफलाम करण्यात बापूसाहेबांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी शेतीसोबतच उद्योगालाही चालना दिली. बापूसाहेबांच्या निधनाने एक धोरणी राजकारणी, सहकारातून जनसेवा करणारा कार्यकर्ता राज्याने गमावला आहे. बापूसाहबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन, अशा भावना सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...