आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Leader & Minister Hasan Mushrif Had Milkbath

शाईफेक प्रकरणानंतर कार्यकर्त्यांकडून हसन मुश्रीफांचा दुग्धाभिषेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादीचे नेते आणि बुलढाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अंगावर काल भर कार्यक्रमात राष्ट्रवादीच्याच एका अपंग कार्यकर्त्याने शाई फेकली होती. त्यानंतर कोल्हापूरात दाखल झालेल्या हसन मुश्रीफांना आज सकाळी कोल्हापूरातील कार्यकर्त्यांनी दुधाने आंघोळ घालत दुग्धाभिषेक केला. त्यामुळे एका मुर्खपणाच्या घटनेलाही मुर्खपणानेच उत्तर दिल्याचे दिसत आहे.
बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले हसन मुश्रीफ काल पालकमंत्री या नात्याने तेथे समाधान योजना कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी पोहचले होते. त्यावेळी नामदेव डोंगरदिवे नावाच्या राष्ट्रवादी अपंग सेलच्या जिल्हाध्यक्षाने भर सभेत व व्यासपीठावर निवेदन देण्याचे सांगून व्यासपीठावर चढून मुश्रीफ बसलेल्या ठिकाणी गेला व काही कळायच्या आतच त्याने त्यांच्यावर तोंडावर व अंगावर शाईची पिशवी रिकामी केली. त्यामुळे अपमानित झालेल्या मुश्रीफांनी तत्काळ चेहरा धुतला व कपडे बदलून कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात हा आमच्याच पक्षाचा अपंग कार्यकर्ता असून, त्याला आपण माफ करतो असे सांगितले.
मात्र, त्यानंतरही त्याला अटक करुन जिल्हाध्यक्ष पदावरुन निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, आज सकाळी रेल्वेने कोल्हापूरात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी आठ वाजता मुश्रीफ यांना कोल्हापुरामधील सर्किट हाऊसवर राष्ट्रवादीच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी दुग्धस्नान घातले. यावेळी प्रत्येकी 40 लिटरची दुधाने भरलेल्या चार कॅननी आंघोळ घातली. यात सुमारे दोनशे लिटर दूध वाया घालवत कार्यकर्त्यांनी कालच्या घटनेचा निषेध करून घोषणा दिल्या.
पुढे पाहा, कालची शाईफेकीची घटना...