आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप पुण्याच्या महापौरपदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप सर्वाधिक ८४ मते मिळवून विजयी झाले. उपमहापौरपदी काँग्रेसचे मुकारी अलगुडे निवडून आले. मनपामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी अाहे. निवडणुकीत ऐनवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी-काँग्रेसचा फायदा झाला. येत्या वर्षभरात मनपाची निवडणूक होणार असल्याने जगताप यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अशोक येनपुरे यांना २५ मते तर शिवसेनेचे सचिन भगत यांना १२ मते मिळाली. भाजपच्या वर्षा तापकीर यांना २५ तर शिवसेनेचे योगेश मोकाटे यांना १२ मते मिळाली.