आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे दत्तात्रय धनकवडे, काँग्रेसचे आबा बागूल उपमहापौर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- मावळत्या महापौर चंचला कोद्रे यांनी महापौरपदाचा कार्यभार धनकवडे यांच्या हाती सोपवला. यावेळी महापौर धनकवडे आणि उपमहापौर आबा बागूल यांचे अभिनंदन करताना कोद्रे.)
पुणे- पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी भाजपचे योगेश टिळेकर यांचा 42 मतांनी पराभव करीत महापौरपद पटकावले. पुणे महानगरपालिकेच्या श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज 11 वाजता निवडणूक प्रक्रिया सुरु झाली. त्यात धनकवडे यांनी बाजी मारली तर, उपमहापौरपदी काँग्रेसचे आबा बागूल यांची निवड झाली आहे. बागूल यांनी भाजपचे भरत चौधरी यांचा पराभव केला.
पुणे महापालिकेत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने ही निवडणूक औपचारिकता होती. धनकवडे आणि बागूल यांना आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली तर, भाजपने योगेश टिळेकर आणि भरत चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, राष्ट्रवादी (52), काँग्रेस (29) आघाडीकडे बहुमत असल्याने सहज विजय मिळवला. धनकवडे यांना 83 मते मिळाली तर टिळेकर यांना 41 मते मिळाली. त्यामुळे धनकवडेंनी टिळेकरांचा 42 मतांनी पराभव केला. मनसे यंदाही तटस्थ राहिली. याचबरोबर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेवर आपला झेंडा रोवला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतही राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. तसेच मागील 15 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर आहे.