आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा पेटवुन घेण्याचा प्रयत्न, प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीवर नाराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांना डावलून नीरंजन डावखरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने प्रदेशाध्यक्षपदाची गटबाजी उफाळून राष्ट्रवादीच्या नाशिक येथील दोन कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत सदर दुर्घटना टाळली.
नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नीरंजन डावखरे यांचे उपस्थितीत पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शनिवारी युवक मेळावा आणि सभासद नोंदणी अभियान बैठक आयोजित करण्यात आली होती. या मेळाव्यात उमेश पाटील सर्मथक असलेल्या नाशिक येथील वैभव मगर आणि धीरज देवरे या कार्यकर्त्यांनी, डावखरे यांना विरोध दर्शवत अंगावर रॉकेल ओतून घेतले. मात्र, काडी पेटवण्या आधीच त्यांना रोखण्यात आल्याने पुढील दुर्घटना टळाली. स्वारगेट पोलीसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना अटक केली असून राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. उमेश पाटील यांना बदलून त्याजागी नीरंजन डावखरे यांच्या नियुक्तीला सदर कार्यकर्त्यांचा विरोध होता.