आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात राष्ट्रवादीच्या प्रतिनिधी संमेलनाला सुरुवात, पवार उद्या मार्गदर्शन करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रतिनिधी संमेलनाला पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, बालेवाडीत आजपासून सुरुवात झाली. संघटन, संघर्ष आणि सामाजिक सद्भभावनावर चर्चा करतानाच पक्षाला भविष्यातली दिशा देण्यासाठी हे संमेलन आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार उद्या सकाळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. या संमेलनाला ज्येष्ठ नेते डी. पी. त्रिपाठी, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ नेते अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अन्य मान्यवर आणि पदाधिकारीही उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धोरणे, उद्दीष्टे आणि भविष्यातील वाटचालीबाबत त्रिपाठी यांनी मार्गदर्शन केले तर आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सभासद नोंदणी, पक्षातल्या निवडणुका आणि पक्षबांधणीबाबत मार्गदर्शन केले.
पुढे पाहा, राष्ट्रवादीच्या प्रतिनिधी संमेलनातील छायाचित्रे...