आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP President Sharad Pawar Comment On Minister Resign Issue In Maharashtra

राजकीय अपघातही होऊ शकतात; शरद पवार यांचे सूचक वक्तव्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पक्षसंघटना मजबूत करणे व जनाधार वाढवणे, यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत.मध्यावधी निवडणुकीबाबत नुकतीच काही सर्वेक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर तयारीला लागणे अपेक्षित आहे. मुदतपूर्व निवडणुकीबद्दल निश्चित सांगता येत नसले तरी कोणत्याही अपघाताला आणि परिणामांना तयार राहावेच लागते, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी चाकण येथे केले.

‘अपघात फक्त रस्त्यावरच होतात असे नाही, राजकीय क्षेत्रातही ते संभवतात,’ हे त्यांचे वाक्य पुरेसे बोलके होते. पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, निवडणुका जवळ असल्याने पक्षाचे जनमानसातील स्थान बळकट करणे याला प्राधान्यक्रम द्यावाच लागेल. मंत्रिमंडळातील काही सहकार्‍यांनी पक्षासाठी काम करण्याची तयारी दाखवली तर काहींना लोकसभेच्या निवडणुकीत रस आहे. त्यामुळे प्रत्येकाचे मत विचारात घेऊन राजीनामे घेतले असल्याचे पवार म्हणाले.

भुजबळ नाशिकमधून लढणार
पक्षाची लोकसभेतील सदस्य संख्या वाढावी यासाठी काही ज्येष्ठ मंडळींना निवडणुकीसाठी तयारी करायची आहे असे सांगून छगन भुजबळ हे नाशिकमधून लोकसभा लढवण्यास तयार असल्याचे उदाहरण पवार यांनी दिले.
पवार म्हणाले..

0 उद्धव यांनी लवासा प्रत्यक्ष पाहावे, मगच टीका करावी.
0 गोव्यातील प्रकार भाजपमध्ये असलेल्या कलहाचे लक्षण.
0 मंत्रिमंडळ, संघटनात्मक फेरबदल येत्या तीन दिवसांत.
0 विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे त्याच पदावर कायम.
0 प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड राजीनामा दिलेला नाही.