आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Is Feeling Much Better He Will Be Discharged Today

मी ठणठणीत, एका जागी बसण्याची सवय नाही; डिस्चार्जनंतर पवारांची प्रतिक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- 'मी पुर्णपणे ठणठणीत आहे. मला एका जागी बसण्याची सवय नाही. पुढील दोन महिने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे मला एकही दिवस सुटी घेता येणार नाही.' अशी राष्‍ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रुबी हॉल हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर प्रतिक्रिया दिली. पवारांनी हॉस्पिटल बाहेर आल्यानंतर उपस्थित पत्रकारांना संबोधित केले.

किडनीच्या त्रासामुळे शरद पवार यांना रविवारी रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्यावर पवार लगेचच मुंबईकडे रवाना झाले. डॉक्टरांनी शरद पवार यांना एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

पवारांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना एक-दोन दिवसांत डिस्चार्स मिळेल. काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचे रुबी रुग्णालयाचे संचालक डॉ. संजय पठारे यांनी सांगितले होते. दरम्यान, पवारांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, अशा अफवा कोणीही पसवू नये व विश्वास ठेवू नये, असे आवाहन राष्ट्रवादीने केले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, शरद पवारांचा रुबी रुग्णालयातील व्हिडिओ...