आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीने वाटल्या गोवऱ्या; सरकारचा केला अनोख्या पध्दतीने निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/पुणे- केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीच्या निर्णयाविरोधात राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले आहे. मुंबईत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.  पुण्यात महात्मा फुले मंडई येथे नागरिकांना गोवऱ्या वाटून सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला. ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
 
पुण्यात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, प्रवक्ते अंकुश काकडे आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते. 
 
सर्वसामान्य नागरिकांना या सरकारच्या काळात जगणे कठीण झाले असून आता त्यात गॅस दरवाढीची भर पडली आहे. सरकारने दरवाढ मागे न घेतल्यास यापुढील काळात आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. 
 
पिंपरी-चिंचवडमध्ये अल्प प्रतिसाद
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांनी तीव्र घोषणा दिल्या गेल्या. मात्र या आंदोलनाला महिलांचा अल्प मिळाला.

पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष व नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी महापौर व नगरसेविका अपर्णा डोके, माजी नगरसेविका अनिता तापकीर, मंदा आल्हाट, शकुंतला भाट तसेच संगीत जाधव, पुष्पा शेळके, सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा गंगा धेंडे, मिनाक्षी उंबरकर, सविता धुमाळ, पौर्णिमा पालेकर, देवी थोरात, शिला भोंडवे, दिपाली देशमुख, सुवर्णा काळभोर, नलिनी शेडगे, दिपाली गायकवाड, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रवक्ते फजल शेख आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

एक नोव्हेंबरपासून विनाअनुदानित गॅस सिलेंडर 93 रुपयांनी महागला आहे. अनुदानित गॅस सिलेंडरचे दर 4.56 रुपयांनी वाढले आहेत. या वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 
''विकास वेडा झाला...माझा संसार उद्धवस्त झाला'', ''बया...बया.....गॅस लय महागला''....''बया...बया....कसली ही महागाई''...अशा मजकूराचे फलक आंदोलक महिलांनी हातामध्ये घेतले होते. तसेच महागाई वाढविणाऱ्या सरकारचा धिक्कार असो...गॅस दरवाढ मागे घेतलीच पाहिजे...अशा घोषणा महिलांनी दिल्या. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी बाल्लेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड मध्ये मात्र गॅस दरवाढ विराधात होणाऱ्या महिलांचा अल्प प्रतिसाद मिळाला.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...