आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Supremo Sharad Pawar Supports To Dhangar Samaj Agitation

धनगर व धनगड एकच, धनगरांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा- शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: शरद पवार)
पुणे- धनगर समाजाच्या कृती समितीने जे म्हणणे मांडले आहे ते योग्य आहे. धनगर आणि धनगड हे एकच आहे. त्यामुळे कृती समितीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. याचबरोबर धनगर समाजाच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचा अपप्रचार जो सुरू आहे तो चुकीचा असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
गेली महिनाभर धनगर समाजाने एसटी या प्रवर्गात टाकण्यासाठी आंदोलन तीव्र केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 2009 साली आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात धनगर समाजाला एसटीत टाकण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त सरकारने चार दिवसापूर्वी धनगर समाजाला तिस-या सूचीत टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, धनगर समाजाने याबाबत तीव्र प्रतिक्रिया देताना गुरुवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले होते. त्यानंतर कृती समितीच्या नेत्यांनी गुरुवारी रात्री शरद पवार यांची भेट घेऊन घटनेतील माहिती, विविध कागदपत्रे यासह विविध राज्यांत हा समाज एससी/एसटी प्रवर्गात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
पवार म्हणाले, धनगर समाजाच्या मागणीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कधीही नव्हती. आमच्या पक्षाने 2009 सालीच जाहीरनाम्यात या मागणीला प्राधान्य दिले होते. मात्र, आदिवासींवर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. मात्र, जे घटनेनुसार आहे व तशी मागणी संबंधित समाजाने केली तरी त्यांची भूमिका चुकीची आहे असे म्हणता येणार नाही. धनगर समाज कृती समितीने आमच्यासोबत ही भूमिका मांडली ती योग्य आहे. राज्य सरकारने चार दिवसापूर्वी धनगर समाजाला तिस-या सुचीत टाकण्याबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत पवारांना छेडले असता ते म्हणाले, ती राज्य सरकारची भूमिका आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक भूमिकेशी मी किंवा माझा पक्ष समर्थन करेल असे नाही.
बबनराव पाचपुते यांनी धनगर समाजाच्या मागणीच्या मुद्यांवरून पक्ष सोडला नसल्याचेही पवारांनी स्पष्ट केले. पाचपुते यांनी का पक्ष सोडला माहित नाही पण त्यांनी माझी उपेक्षा झाल्याचे म्हटले आहे. ज्या व्यक्तीला 9 वर्षे कॅबिनेटमंत्रीपद दिले व पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद दिले तरी त्यांची उपेक्षा केली वाटत असेल तर पक्षांत हजारो कार्यकर्ते असतात याची जाणीव ठेवायला पाहिजे असा चिमटा पवार यांनी काढला. मोदी सरकारच्या कामगिरीबाबत प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, दोन महिन्यावरून एखाद्या सरकारची कामगिरी मोजणे अशक्य आहे. नियोजन आयोगाच्या बरखास्तीचा निर्णय मोदींनी घेतला असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, या जागी ती कोणती यत्रंणा उभी करतात त्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल.
शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहले धनगरांना 'एसटी' प्रवर्गात टाकण्याबाबत पत्र...
राष्ट्रवादीने धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा का दिला वाचा पुढे...