आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Working President Jitendra Awhad Critics On Raj Thackeray

राज ठाकरे नेता नसून एक कॉमेडियन- जितेंद्र आव्हाड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- राज ठाकरे नेता नसून एक कॉमेडियन आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रातील जनतेला बरीच वर्षं कॉमेडियन कसा असतो हेच माहित नव्हते. मात्र आता राज ठाकरे यांच्यामुळे ही कमतरताही भरून निघली आहे असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
मिरजमधील शिवाजी क्रीडांगणावर रविवारी रात्री जयंत चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्याचे उद्‌घाटन जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज ठाकरे कॉमेडियन असल्याची प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली. राज यांनी पुण्यातील सभेत टोलपुरताच विषय आपल्या भाषणात ठेवला. त्यामुळे आपसूकच ही टीका सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या पक्षाकडे म्हणजेच राष्ट्रवादीभोवती केंद्रित झाली. जितेंद्र आव्हाड आणि प्रवक्ते नवाब मलिक यांना ही टीका झोंबली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात टोलविरोधी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात अनेक ठिकाणी टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली आहे. याचबरोबर रविवारी रात्री पुण्यातील एसपी कॉलेज मैदानवर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे नकला करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर निशाणा साधला. राज यांनी भाषणात सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची मिमिक्री केली होती. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वक्तव्याबाबत शाब्दिक कोट्या केल्या. शाब्दिक खेळ करत राज यांनी हशा आणि टाळ्या वसूल केल्या, असे आव्हाड म्हणाले.