आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एनडीए’च्या कॅडेट‌्सची पासिंग अाॅऊट परेड जल्लाेषात, विमानांच्या चित्तथरारक कसरती करून जिंकली मने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत अाणि प्रसन्न, अाल्हाददायक वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीच्या (एनडीए)१३१ व्या तुकडीची पासिंग अाऊट परेड मंगळवारी जल्लाेषात पार पडली. सुमधुर लष्करी बॅण्डच्या संगीतात एनडीए कॅडेटसने प्रमुख पाहुणे संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांना मानवंदना देऊन शिस्तबद्ध संचलन केले. या वेळी ध्रुव हेलिकाॅप्टर, सूर्यकिरण, मिग विमानांच्या चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांची मने जिंकली.

या वेळी डाॅ. भामरे म्हणाले, ‘तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण करून जबाबदार लष्करी अधिकारी तयार करण्याचे काम एनडीए करीत अाहे. देशाच्या लष्कराला नेतृत्व देणारी ही संस्था असून तिन्ही दलांचे प्रशिक्षण देणारी जगातील पहिली सर्वाेत्तम प्रशिक्षण संस्था एनडीए असल्याची बाब देशवासीयांसाठी गाैरवास्पद अाहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या अकॅडमीचा इतिहास असून उत्तम प्रकारचे अधिकारी देशसेवेस अर्पण करण्यात अालेले अाहेत. देशाच्या रक्षणाकरिता प्राणांची अाहुती देणारे अधिकारी लष्करात असून त्यांचा अापणास अभिमान अाहे.’

कॅडेटच्या यशाचे श्रेय पालकांना
- राष्ट्रपतींचे सुवर्णपदक विजेता कॅडेट चंद्रकांत अाचार्य याने सांगितले की, मी अाेरिसा राज्यातील भुवनेश्वरचा रहिवासी असून माझे वडील प्राध्यापक अाहेत. लष्करात दाखल हाेण्यासाठी मला कुटुंबीयांनी प्राेत्साहन िदले. एनडीएतील तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मी लष्कराच्या सेवेत दाखल हाेणार अाहे.
- रजतपदक विजेता हेमंत पुनिया याने यशाचे श्रेय कुटुंबीयांसमवेत शाळेला तसेच एनडीएतील स्टाफला दिले. ‘राजस्थानमधील िचरू या गावचा मी रहिवासी असून माझे अार्इ-वडील शिक्षक अाहेत. क्रिकेट व हाॅकीचा मला छंद असून पुढील काळात लष्करी सेवेत रुजू हाेणार अाहे.’

- ब्राँझपदक विजेता अमरप्रीत धत्त म्हणाला, ‘पंजाब राज्यातील बिसवा येथील मी मूळचा रहिवासी असून माझे वडील पाेलिस अाहेत. इंजिनिअर हाेण्याचे सुरुवातीला माझे स्वप्न हाेते. मात्र, माझ्या काकांनी मला लष्करात जाण्यासाठी प्राेत्साहन िदले. घरात पार्श्वभूमी नसताना मी लष्करात दाखल झालाे याचे श्रेय पालकांना अाहे.’
बातम्या आणखी आहेत...