आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एनडीए’मधील कर्मचारी भरती प्रकरण : कर्नलला न्यायालयीन कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘एनडीए’मधील कर्मचारी भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारात सहभागी असलेले परीक्षा विभागाचे प्रमुख कर्नल ए. के. सिंग यांची विशेष सत्र न्यायाधीश डी. आर. महाजन यांनी बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
सीबीआयचे वकील विवेक सक्सेना व अय्युब पठाण यांनी सांगितले की, सिंग यांच्या कार्यालयाच्या मागील बाजूला काही जळालेले पेपर मिळाले आहेत. गैरव्यवहारादरम्यान कर्नल कुलबीर सिंग यांनी ए. के. सिंग यांना 52 लाख रुपये दिले असून विविध 12 परीक्षार्थींनी 22 लाख रुपये दिले आहेत. सदर रक्कम सिंग यांच्याकडून सीबीआयला हस्तगत करावयाची आहे. सिंग यांचा लॅपटॉप व पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला असून तो तपासणीसाठी पाठवला असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. कर्नल तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयने केली. मात्र, ती मागणी कोर्टाने मान्य केली नाही.
कोर्टात लिंबाचा उतारा- कर्नल ए. के. सिंग यांची पत्नी व मुलीने सिंग यांना न्यायालयात दाखल करण्यापूर्वी लिंबू, हळद व कुंकवाचा उतारा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अतिरिक्त सत्र न्यायाधीश महाजन यांच्या न्यायालयापर्यंत टाकलेला होता. आज न्यायालयात सीबीआयच्या वकिलांचा कोणताही मुद्दा परिणामकारक न होता सिंग यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यामुळे न्यायालय परिसरात या लिंबाची काळी जादू चालली अशी चर्चा होती.