आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करातील नेतृत्वासाठी वेगळ्या कौशल्याची गरज, अंदमानचे नायब राज्यपाल सिंग यांचे मत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘सैन्यदलात नेतृत्व करण्यासाठी अमर्यादित जबाबदारीचा स्वीकार, देशाप्रती समर्पणाची भावना तसेच प्रत्येक वेळी जिंकण्याचा निर्धार या त्रिसूत्रीचा जीवनशैली म्हणून अंगीकार करणे आवश्यक आहे,’ असे मत अंदमान-निकोबारचे नायब राज्यपाल (निवृत्त) लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 126 व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारोहप्रसंगी ते बोलत होते. एनडीएचे कमांडंट जनरल एअरमार्शल कुलवंतसिंग उपस्थित होते.
या वेळी 152 कॅडेट्सना विज्ञान शाखेची, 103 कॅडेट्सना सामाजिक शास्त्र शाखेची, तर 97 कॅडेट्सना संगणक विज्ञान शाखेची पदवी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातर्फे देण्यात आली. तीनही शाखांमधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवणारा कॅडेट अंकुर रावत याने नौदल व वायुदल प्रमुखांचा चषक पटकावला. कॅडेट साकेत कुमार याने संगणक विज्ञान शाखेतून, तर कॅडेट दीपक कुमार याने विज्ञान शाखेतून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला.

छायाचित्र :विज्ञान, सामाजिकशास्त्रे व संगणक विज्ञान या तिन्ही शाखेत प्रथम क्रमांक पटकावणारा कॅडेट अंकुर रावत (मध्यभागी) याचा करंडक देऊन सन्मान करण्यात आला. त्याच्यासोबत कॅडेट साकेत कुमार व कॅडेट दीपक कुमार.