आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील एनडीएच्या वाढीव धावपट्टीला अखेर मान्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) मधील वायुसेना प्रशिक्षणासाठीच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणास संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे एनडीएमधील प्रशिक्षण अधिक प्रभावी होईल, अशी माहिती एनडीचे वायुसेना प्रशिक्षणप्रमुख विंग कमांडर एस. के. सिंह यांनी येथे दिली.

एनडीएमधील लष्कराच्या तिन्ही विभागांच्या प्रशिक्षणाच्या डेमो ट्रेनिंगप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. एनडीमधील वायुसेना प्रशिक्षणाची धावपट्टी वाढवण्यास संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवल्याने टेंडर प्रक्रियाही सुरू झाली असून येत्या जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे विंग कमांडर सिंह यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी सुमारे 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे. सध्याचा रनवे 900 बाय 15 मीटर्सचा असून, विस्तारीकरणानंतर तो 1500 बाय 30 मीटर्सचा होईल. त्यामुळे भारतीय वायुसेनेची मालवाहतूक विमानेही या धावपट्टीवर उतरू शकतील. येथील प्रशिक्षणाच्या विमानांसाठी सध्या एकच हँगर आहे. दुसर्‍या हँगरते काम सुरू असून ते या जूनअखेर पूर्ण होईल. सध्या प्रशिक्षणासाठी 6 सुपर डिमोनो विमाने असून, त्यात अजून 5 सुपर डिमोनोंची भर पडून एकूण 11 विमाने उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले. एनडीएचे कमांडंट एअर मार्शल कुलवंत गिल म्हणाले, येथील कॅडेट्सच्या अभ्यासक्रमातील 20 टक्के भाग बदलण्यात आला आहे. येथील पायाभूत शिक्षण-प्रशिक्षणात थिअरी आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही पातळ्यांवर सुधारणा व बदल केले जात आहेत.