आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Need To Economical Provision For Judiciary Adv. Asim Sarode

न्यायव्यवस्थेला आर्थिक तरतुदीची गरज - अ‍ॅड.असीम सरोदे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - लोकशाही व्यवस्थेत समाजाला जलद गतीने व योग्य रीतीने न्याय देण्यासाठी न्यायव्यवस्था बळकट करणे आवश्यक आहे. प्रथमश्रेणी न्यायालयांपासून तर जिल्हा न्यायालयांपर्यंतच्या न्यायाधीशांना तुटपुंज्या इमारती व पायाभूत सुविधेत काम करावे लागत आहे. न्यायव्यवस्थेकडून कामाची अपेक्षा करताना त्यासाठी आर्थिक तरतूद वाढवण्याची गरज असल्याचे मत अ‍ॅड.असीम सरोदे यांनी बुधवारी व्यक्त केले.

सरोदे म्हणाले, लोकसंख्येच्या प्रमाणात न्यायाधीशांची संख्या कमी असतानाही लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम आहे. ही गोष्ट राजकीय लोकांच्या अडचणीची असल्याने न्यायव्यवस्थेला अडगळीत टाकण्याचे प्रयत्न सुरू आहे. न्यायालये बांधणे, न्यायाधीशांच्या नेमणुका करणे, पक्षकारांसाठी न्यायालय ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्यात थेट आर्थिक गुंतवणूक करणारी आर्थिक तरतूद करावी.आरोग्य व शिक्षण या मूलभूत हक्कांसाठी आर्थिक तरतूद करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.