आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याच्या पोटात गेली सुई; पुण्यातील धक्कादायक प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- किडलेली दाढ काढण्यासाठी चिमुकल्यावर उपचार सुरू असताना पोटात सुई गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अधिराज भास्कर माळी (वय-5) असे चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेवरून डॉक्टरांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, पिंपरी येथील डीवाय पाटील रुग्णालयात उपचारासाठी आले होते. यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपकरणाची सुई त्याच्या पोटात गेली. अधिराज आज (सोमवारी) सकाळी त्याच्या  वडिलांबत रुग्णालयात आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी ड्रील मशीनद्वारे उपचार करण्यास सुरुवात केली असता मशीनचे बीट (सुई) गळून थेट अधिराजच्या पोटात गेली. यावर रुग्णालयातील डॉक्टर मात्र काहीच बोलायला तयार नाही.

तब्बल चार तास उलटून देखील पोटातील सुई बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनी उपचार केले नाहीत, असा आरोप अधिराजचे वडील भास्कर माळी यांनी केला आहे. अधिराजला केळी खाऊ घाला म्हणजे सुई बाहेर पडेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याची माहिती माळी यांनी दिली आहे. याप्रकरणी डॉ.पी.डी. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... घटनेचे फोटो आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...