आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Neela Satyamarayan Comment In Pune For Right To Recall

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘राइट टू रिजेक्ट’साठी सामूहिक परिपक्वता हवी; नीला सत्यनारायण यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर देशात ‘राइट टू रिजेक्ट’ अमलात येण्यासाठी लोकशक्तीची सामूहिक परिपक्वता हवी, असे मत राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी शनिवारी मांडले. मात्र, अशी परिपक्वता सध्या तरी दृष्टिपथात नाही, असेही त्या म्हणाल्या.

मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजतर्फे आयोजित युवा स्पंदन शिबिराचे उद्घाटन सत्यनारायण यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. देशात निवडणुका जाहीर झाल्यावर मतदारांना ‘राइट टू रिजेक्ट’ मिळावा, अशी चर्चा सुरू आहे. ‘राइट टू रिजेक्ट’ देशात आहेच, पण त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही कारण तेवढी राजकीय प्रगल्भता देशाच्या सर्वसामान्य मतदारांमध्ये अद्याप निर्माण झालेली नाही. तसेच याअंतर्गत ज्या तरतुदी व नियमावली आहेत, त्या अत्यंत गुंतागुंतीच्या असल्याने त्याविषयी संभ्रमच अधिक आहेत, असे त्या म्हणाल्या.

निवडणुकांचे खर्च वाढतच चालले आहेत, या मुद्दय़वर सत्यनारायण यांनी संमती दर्शवली. खर्च वाढत आहे, हे सत्य आहे. त्याविषयी मला काळजी आणि खंत वाटते. पण हे बदलण्यासाठीची इच्छाशक्तीही लोकांनीच दाखवायची आहे. उमेदवार मतदारांना पैसे वाटतात, यात्रा घडवतात, भेटवस्तू देतात, सोसायट्या रंगवून देतात, पैठण्या वाटतात, सहलीला नेतात. अशा बाबींना मतदारांनी नाही म्हणणे आवश्यक असल्याचे निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी या वेळी बोलताना सांगितले.

विश्वस्ताची भूमिका हवी
प्रशासकीय अधिकार्‍यांनी आपले अधिकार हे भरताचे राज्य आहे, या भावनेने वापरले पाहिजेत. र्शीरामचंद्रांच्या पादुका सिंहासनावर ठेवून विश्वस्ताच्या भूमिकेने राज्यकारभार पाहणार्‍या भरताची भूमिका प्रशासकीय अधिकार्‍यांनी वठवली पाहिजे. लोकांना उत्तरदायी राहून काम केले पाहिजे, अशी भावना नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केली.