आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा \'माळीण\' होण्याची भीती, पुनर्वसनानंतर पहिल्याच पावसात घरांना गेले तडे, रस्तेही खचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अवघ्या दोन महिन्यांपूर्वी पुनर्वसित माळीण गावाचे लोकार्पण करून राज्य सरकारची संवेदनशीलता  कृतीतून दाखवून देत जनतेची दाद मिळवणाऱ्या सरकारी यंत्रणेने केलेले काम पहिल्याच पावसात वाहून गेल्याचे विदारक चित्र पुनर्वसित माळीणमध्ये पाहायला मिळत आहे.  
  
तीन वर्षांपूर्वी ३० जुलै २०१४ रोजी पडलेल्या मुसळधार पावसाने भीमाशंकरजवळच्या  माळीण  गावावर डोंगरकडा कोसळला आणि माळीण गाव त्यात गडप झाले होते.  एप्रिल २०१७ मध्ये पुनर्वसित माळीण गावाचे लोकार्पणही झाले. मात्र, अवघ्या दोन महिन्यांत पहिल्याच पावसात नव्या माळीणची दुर्दशा झाली आहे.भीमाशंकर परिसरात शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पहिल्याच जोरदार पावसात नव्या माळीणमधील नव्याने उभारलेली ६७ घरे, घरांच्या भिंती, पायऱ्या, ड्रेनेज पाइप्स, शाळा, मंदिर यांना तडे गेले आहेत. काही ठिकाणी रस्ते, भिंती, पायऱ्या खचल्या आहेत. रस्त्यांचे भराव वाहून गेले आहेत. त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. शाळेवर भिंत कोसळण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात पुन्हा धास्ती अाहे.
 
पुढच्या स्लाइड्समधून पाहा, काय अवस्था झालीय पुनर्वसनानंतर माळीणची....
बातम्या आणखी आहेत...