आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायलट प्रोजेक्ट यशस्वी: झाडांच्या गणनेसाठी अद्ययावत अँप विकसित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वनक्षेत्रातील प्राणिगणना सर्वांनाच ठाऊक आहे. आता वृक्षसंपदेचीही गणना करणे न्यायालयाने अनिवार्य केले आहे. अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांतील क्षेत्र र्मयादित असल्याने प्राणिगणनेचे काम सोपे ठरते; पण वृक्षसंपदा विखुरलेली असल्याने वृक्षगणनेचे काम क्लिष्ट, वेळखाऊ बनते. शिवाय तज्ज्ञ मनुष्यबळाची समस्या जाणवते. या पार्श्वभूमीवर पुण्यातील वनस्पतीशास्त्रतज्ज्ञ आणि आयटीतज्ज्ञांनी ‘स्मार्ट सर्व्हे’ हे नवे अद्ययावत अँप विकसित केले आहे.

नव्या अँपने सादर केलेला पायलट प्रोजेक्ट यशस्वी ठरला आहे. अँपच्या संशोधनाची दखल उच्च न्यायालयानेही घेतली असून महापालिकांनीही या अँपप्रणालीचा वापर करून वृक्षगणना करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षसंरक्षण व संवर्धन अधिनियम 1975 (सुधारित 14 डिसेंबर 2009) अनुसार राज्यातील प्रत्येक मनपाने दर पाच वर्षांनी वृक्षगणना अनिवार्य केली आहे. मात्र तज्ज्ञ मनुष्यबळाचा अभाव, शास्त्रीय दृष्टिकोनाविषयी उदासीनता व राजकीय लागेबांधे यामुळे गणनेकडे मनपा दुर्लक्ष करतात.

ट्रॅक बाउंड्री फीचरची सोय (प्रत्येक प्लॉटनुसार वर्गीकरण)

स्मार्ट सर्व्हे अँपचे फायदे
0वृक्षगणना कालावधी तीन पटींनी कमी
0जीपीएसमुळे प्रत्येक वृक्षाची सविस्तर माहिती
0गुगल अर्थवर विनामूल्य पाहणे शक्य
0अवैध वृक्षतोडीवर आळा घालणे शक्य
0संवेदनशील वृक्षसंपदेसाठी उपयुक्त
0जैवविविधतेविषयीचे निष्कर्ष त्वरित उपलब्ध
0वृक्षओळखीसाठी विशेष प्रणाली
0कार्बट क्रेडिट क्षमताही तपासणार

पुणे, कोल्हापुरात काम
वृक्षगणनेचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला असून थेट उच्च न्यायालयाने आमच्या संशोधनाची दखल घेतली आहे. पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गणनेचे काम आमच्याकडे आले आहे. कोल्हापूर मनपानेही टेंडरचे काम सुरू केले आहे, असे गोहड म्हणाले.

काय आहे अँप?
जीआयएस आणि जीपीएस यंत्रणेचा कल्पक वापर या अँपमध्ये केला आहे. वृक्षगणनेचा कालावधी या अँपमुळे तीन पटींनी कमी होणार असून अचूकता, नेमकेपणा आणि संख्यात्मक तसेच गुणात्मक आकडेवारीचा सविस्तर डाटा उपलब्ध होणार आहे. कार्बन क्रेडिटही मिळवता येणार आहे.

पेटंटची प्रक्रिया पूर्ण
आमच्या टीममध्ये आयटी व वनस्पतीशास्त्रज्ञांचा समावेश असल्याने पूरक संशोधन शक्य झाले. टीमने यापूर्वीच्या वृक्षगणनेत सहभाग घेतल्याने कामाची व्याप्ती, गरजा नेमक्या माहिती होत्या. हे अँप फक्त महाराष्ट्रापुरते र्मयादित नाही. भविष्यात ते अन्य राज्य, देश आणि त्यानंतर सार्क देशांमध्येही वापरले जाण्याची शक्यता आहे. कॉपीराइट आणि पेटंटची प्रक्रिया यापूर्वीच सुरू केली आहे.’ संदीप गोहड, संचालक, स्मार्ट सर्व्हे