आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक स्थळांसाठी ‘भुवन’ पोर्टल, महाराष्ट्रात पायलट प्रोजेक्टची सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आपला प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा जपणारी शेकडो स्थळे विविध राज्यांत विखुरलेली आहेत. या वास्तूंचे जतन, देखभाल, दुरुस्ती यांची जबाबदारी आर्कियालॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे (एएसआय) आहे. देशातील अनेक वारसास्थळांना अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. हे प्रमाण वाढू नये, या उद्देशाने एएसआयने सॅटेलाइट मॅपिंगचा उपक्रम सुरू केला आहे.
त्यासाठी ‘भुवन’ या नावाने पाेर्टल तयार करण्यात अाले आहे. ‘भुवन’मुळे या वारसास्थळांचे जतन, देखभाल, संरक्षण अधिक प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्रात यासंबंधीच्या पायलट प्रोजेक्टची सुरुवात झाली आहे. सध्या ३६८६ वारसास्थळे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत, ज्यांची देखभाल आणि जतनाची जबाबदारी ‘एएसआय’कडे आहे.

एएसआयमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारसास्थळांच्या भोवतालाचे संदर्भ सॅटेलाइट मॅपिंगमुळे अधिक सुस्पष्ट होतील. गुगल अर्थसारखेच ‘भुवन’या पोर्टलचे स्वरूप असेल. सिटी सर्व्हे रिपोर्टसचीही मदत घेतली जाईल. सॅटेलाइट मॅपिंगमुळे वारसास्थळांच्या सीमा, अंतरे, संरक्षित परिसर यांची अधिक कसोशीने काळजी घेणे शक्य होईल. अतिक्रमणांना आळा बसेल तसेच झालेले अतिक्रमण सप्रमाण सिद्ध करता येईल.
असे आहेत निकष
> प्राचीन तसेच ऐतिहासिक वारसास्थळांच्या परिघात १०० मीटर्स अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नाही.
> मूळ वास्तूच्या सौंदर्याला बाधा वा अडथळा येऊ नये म्हणून पुढील २०० मीटर्स अंतरापर्यंत
विशिष्ट उंचीच्या बांधकामावर निर्बंध
> वारसास्थळाचे साैंदर्य, रचना, मांडणी अबाधित राहावी म्हणून प्रदूषणकारक घटकांना मनाई
उपक्रम स्वागतार्ह
एएसआयचा उपक्रम स्वागतार्हच आहे. शनिवारवाडा, पाताळेश्वर लेणी यासारखी राज्यातील काही वारसास्थळे अनेक वर्षांपूर्वी अतिक्रमणांनी वेढली होती. वारसास्थळांना लागून, चिकटून अतिक्रमणे झाली होती. या पार्श्वभूमीवर एएसआयने घेतलेला निर्णय योग्यच आहे.
किरण कलमदानी, हेरिटेज आर्किटेक्ट

प्रशासनाचे सहकार्य हवे
सॅटेलाइट मॅपिंगमुळे वारसास्थळे जपण्यास मदत होईल, हे खरे असले तरी स्थानिक प्रशासनानेही आपल्या हद्दीतील वारसास्थळांना प्राधान्य देऊन साह्य केले पाहिजे.
मोहन शेटे, इतिहासप्रेमी मंडळ
बातम्या आणखी आहेत...