आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणावळ्यात रेल्वे लाईनवर सापडले नवजात अर्भक, वेळीच नजर पडल्याने थोडक्यात बचावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. तीन दिवसांच्या नवजात अर्भकाला प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरुन लोणावळा रेल्वे ट्रॅकवर मरण्यासाठी ठेवण्यात आले होते. सुदैवाने दोन युवकांनी ही बॅग बघितली. त्याचा जीव वाचवला. याची माहिती पोलिसांना देऊन त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रेल्वे लाईनवरुन बाळाला उचलल्यानंतर जरा वेळाने मालगाडी गेली. युवकांची नजर पडली नसती तर बाळाच्या शरीराच्या अगदी चिंध्या झाल्या असत्या.
असे आहे संपूर्ण प्रकरण
- मंगळवारी सकाळी लोणावळा रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली. लोणावळा येथील रहिवासी सुहास साबळे आणि तेजस राईलकर जिमला जात होते.
- त्यांना रेल्वे लाईनवर निळ्या रंगाची प्लॅस्टिकची बॅग दिली. ही बॅग आतून हलत होती. दोघांना संशय आला. त्यांनी बॅग उघडून बघितली तर धक्काच बसला.
- प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये कापडात गुंडाळलेले नवजात अर्भक होते. थंडी वाजत असल्याने तो थरथर कापत होता. दोघांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
- आता बाळाची प्रकृती उत्तम आहे. शुगर लेव्हल कमी झाल्याने आणले तेव्हा बाळ बेशुद्ध झाले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, घटनेशी संबंधित फोटोज....
बातम्या आणखी आहेत...