आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Born Child News In Marathi, Pune, Police Station

इंदापूरमध्‍ये नवजात मुलीला टाकून नातेवाइकांनी काढला पळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - पाच ते सात दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीला सोडून नातेवाइकांनी पळ काढल्याचा हा हृदयद्रावक प्रकार पुणे जिल्हय़ातील वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे घडला.मंगळवार रात्री आठच्या सुमारास वालचंदनगर पोलिस ठाण्याजवळ अचानक कुत्र्यांचे भुंकणे सुरू झाले. या गोंगाटामुळे चोर आले असावेत असा लोकांचा ग्रह झाला.

मात्र प्रत्यक्षात पाहिले तेव्हा एका तान्ह्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला. एक नवजात मुलगी घरांच्या बाहेरील बाजूला एका कोपर्‍यात कोणीतरी सोडून गेल्याचे लोकांना आढळले. या प्रकारानंतर त्या ठिकाणी असणार्‍या नागरिकांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांनी इतर सहकार्‍यांसह वस्तीकडे धाव घेतली. त्या बाळाला घेऊन ते प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. त्या ठिकाणी लहान बाळांच्या संगोपनाची सोय नसल्याने बाळाला इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.