आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील रस्त्यावर धावणार सर्व सोयींनीयुक्त अलिशान घर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: (गिरिकंद ट्रॅवल्स द्वारा तयार करण्यात आलेले मोबाइल घर)

पुणे - तुम्ही फिरण्यासाठी अथवा पिकनिकसाठी बाहेर जाणार असाल आणि तुमचे घर तुमच्या सोबत फिरायला आले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? होय आता पुण्याच्या रस्त्यावर फिरणार आहे सर्व सोयींनीयुक्त घर. हे मोबाइल घर पुण्यातील नामांकित गिरिकंद ट्रॅव्हल्सतर्फे तयार करण्यात आले आहे. याचे नाव 'ग्रॅँड चेरियट' असे ठेवण्यात आले असून यामध्ये घरात असणारी प्रत्येक गोष्ट बनवण्यात आली आहे.

यात आहेत अत्याधुनिक सुविधा
या बसमध्ये जवळपास 1बीएचके फ्लॅट इतक्या जागेचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये हॉल, केबिन, लाउंज, बेडरूम आणि टॉयलेट तयार करण्यात आले आहे. लाउंजमध्ये 2 सोफे, 4 खुर्च्या , टी सेट आणि 42 इंचीचा एलईडी टिव्ही लावण्यात आला आहे. या शिवाय मायक्रोव्हेव ओव्हन, फ्रीज, मिनी बार, चहा, कॉफी बनवण्यासाठी इलेक्ट्रिक मशीन याची सोय करण्यात आली आहे.तसेच 2 बेडचे एक बेडरूम, टॉयलेट आणि शॉवरची सुविधा असलेले बाथरुम देण्यात आले आहे. ड्राइवर केबिनमध्ये इंटरकॉम फॅसिलिटी देण्यात आली आहे.

सामान्य व्यक्ती करु शकणार सफारी

गिरीकंद ट्रॅवल्सचे व्यावस्थापक सुहास गणपुळे यांच्यामते या खास मोबाइल घरचा वापर मुकेश अंबानी यांच्या सारखे मोठे उद्योगपति अथवा अमिताभ, शाहरुख, सलमान खान यांसारखे प्रसिद्ध स्टार्स करतात. पण आता या आलीशान बसमध्ये सामान्य व्यक्तींना देखील सफारीचा आनंद लूटता येणार आहे.

रोज 40 हजाराचा खर्च
या सफारीसाठी येणारा खर्च सामान्य व्यक्तीना परवडण्यासारखा नसून कंपनीच्या अंदाजे यासाठी रोज 40 हजार रुपये खर्च करावा लागणार आहे. यामध्ये फिरण्याचा आनंद लूटण्यासाठी यात्रेकरुंना 150 रुपये प्रति किलोमीटर हिशोबाने भाडे खर्च करावे लागणार आहे. ही बस एका दिवसाला 250 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. गणपुळे म्हणाले की, या आलीशान बसची सफारी करण्यासाठी पुणे आणि मुंबईतील मोठ्या कॉर्पोरेटमधून चौकशी करण्यासाठी फोन येणे सुरु झाले आहे.
कॉरपोरेट बिझनेस मिटिंग्ससाठी उपयोगी
यामध्ये वायफाय, मिटिंग टेबल आणि एसी लावण्यात आला आहे. यात मोकळी जागा असल्याने येथे बिझनेस मिटिंग घेणे शक्य होणार आहे.
जेष्ठ नागरिकांसाठी आरामदायक
घरातील जेष्ठ नागरिक फार लांबचा प्रवास करु शकत नसल्याने अगदीच लांबचा प्रवास करावा लागल्यास त्यांचा प्रवास आरामदायक होऊ शकतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आलीशान मोबाइल घराचे आतील बाजूचे फोटो..