आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नवी समिती स्थापन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- यापूर्वी चौथी आणि सातवी इयत्तेसाठी घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी आणि आठवी इयत्तेसाठी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या शिष्यवृत्तींचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी राज्य शासनाने नवी समिती स्थापन केली आहे. या समितीत ११ सदस्यांचा समावेश आहे.

इयत्ता पाचवीसाठीची परीक्षा प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता आठवीसाठीची परीक्षा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या नावाने आता ओळखली जाणार आहे. या परीक्षांचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी राज्य शासनाने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांची समिती नेमली आहे. ही समिती ठराविक मुदतीत आपला अभ्यासक्रमविषयक अहवाल सादर करणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षा अंमलात येणार आहेत.
अशी अाहे समिती
अध्यक्ष – गंगाधर म्हमाणे, सदस्य- राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आणि प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक गोविंद नांदेडे, बुलडाण्याचे प्राचार्य सुभाष कांबळे, विमलाबाई गरवारे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता काजरेकर, अध्यापिका पूजा जाधव, शलाका परब आदींचा या समितीत समावेश आहे.