आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य गौरव ई-बुक देणार अ.भा.म. साहित्य संमेलनाचा वृत्तांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साहित्य संमेलनाच्या ई-बुकचे प्रकाशन रविवारी झाले. - Divya Marathi
साहित्य संमेलनाच्या ई-बुकचे प्रकाशन रविवारी झाले.
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा साद्यांत वृत्तांत कथन करणारे ई-बुक रविवारी पुण्यात प्रकाशित करण्यात आले. ‘मराठी साहित्य गौरव’ असे या ई-बुकचे शीर्षक आहे. या ई-बुकमुळे मराठी साहित्य संमेलन इतिहासासकट जगभरात पोहोचणार आहे.

साहित्य संमेलनाचे आयोजक डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि ई-बुक क्षेत्रातील डेली हंट यांच्यातर्फे या ही निर्मिती करण्यात आली आहे. सीड इन्फोटेकचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र बऱ्हाटे यांच्या हस्ते हे-बुक प्रकाशित झाले. या वेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, संमेलन समन्वयक सचिन इटकर, अरुण शेवते आदी उपस्थित होते.

‘आपल्या भाषा व संस्कृतीवर सध्या चार प्रकारची आक्रमणे होत आहेत. इंग्रजी भाषेचा अवास्तव बडीवार, सोशल मीडिया, मोबाइल संस्कृती आणि क्लाऊडच्या माध्यमातून माहितीची साठवण करण्याची ताकद ही ती आव्हाने आहेत. यापैकी पहिल्या दोन आव्हानांना या ई-बुकने उत्तर दिले आहे. यातून जगभरातील मराठी माणूस संमेलनाशी जोडला जाईल,’ असे बऱ्हाटे म्हणाले.

निषेधाचा ठराव
साहित्य संमेलनात दरवर्षी अनेक ठराव मांडले जातात. या वर्षी नियोजित संमेलनाध्यक्षांना काही व्यक्ती तसेच गटांकडून देण्यात आलेल्या धमकीचा निषेध करणारा ठराव मांडला जाईल. तसेच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांना ज्या पद्धतीने मारण्यात आले त्या घटनेचा निषेधही ठरावाद्वारे केला जाणार आहे, असे समजते. मात्र, त्यापूर्वी हे ठराव नियामक मंडळासमोर आणले जातील, असा उल्लेख डॉ. माधवी वैद्य यांनी केला.
असे आहे ई-बुक
- आजवरच्या ८८ संमेलनांचा इतिहास
- साहित्य महामंडळाची माहिती
- आयोजक संस्थेची संपूर्ण माहिती
- संमेलनाची संपूर्ण कार्यक्रमपत्रिका
- माजी संमेलनाध्यक्षांची ओळख