आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इथेनॉलचे घोडे अडलेलेच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - देशात वारंवार इंधन दरवाढीने बेजार झालेल्या जनतेला दिलासा देऊ शकणारे इथेनॉल धोरण शासनाच्या प्रभावी अंमलबजावणीअभावी भिजत पडले आहे. इथेनॉल निर्मिती करणा-या प्रकल्पांना पेट्रोलियम कंपन्या देऊ करत असलेले दर परवडत नाहीत. तर इथेनॉल निर्मितीसाठी लागणा-या मोलॅसिसला इतर रासायनिक पदार्थ व औद्योगिक वापरासाठी चढ्या भावात मागणी असल्याने पेट्रोल कंपन्यांना मागणीच्या तुलनेत तोकडा इथेनॉल पुरवठा होतो. परदेशातून मोठ्या प्रमाणावर तेल आयात करताना कोट्यवधी रुपये खर्च करणा-या शासनाला इथेनॉल प्रकल्पांची भाववाढीची हाक ऐकू येत नाही. सन 2003 मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे घोडे प्रभावी अंमलबजावणीअभावी गेल्या दहा वर्षांपासून 5 टक्क्यांवर अडले आहे. तर युरोपीय देशांप्रमाणे भारत इंधनात इथेनॉल मिश्रणाचा 25 टक्क्यांचा आकडा केव्हा पार करणार, असा प्रश्न उपस्थित होतो.
आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपया घसरल्याने पेट्रोलच्या दरात वाढ करावी लागत आहे, असे सांगितले जात आहे. आपला देश दरवर्षी 70 टक्के क्रुड तेलाची आयात करतो. याउलट 3 लाख टन मोलॅसिस निर्यात करतो. त्यावर आपल्याच देशात प्रक्रिया केल्यास 8 कोटी लिटर इथेनॉल तयार होऊ शकते. देशाला सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी फक्त 104 कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. तुलनेने देशाची आयात करावी लागणा-या क्रुड तेलाची गरज सुमारे 110 मिलियन टन आहे. देशात 147 इथेनॉल निर्मिती प्रकल्प आहेत. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात 90 प्रकल्प आहेत. त्यामुळे देशाच्या इंधन धोरणाची अवस्था काखेत कळसा अन् गावाला वळसा अशी झाली आहे. जागतिक स्तरावर युरोपीय देश इथेनॉलच्या निर्मितीवर भर देत असल्याने स्वीडनसारख्या देशाने आपली क्रुड तेलाची गरज निम्म्याहून अधिक कमी केली आहे. तेथे आता गॅस व डिझेलमध्येही इथेनॉलचा वापर केला जातो. ऊसशेतीच्या बाबतीत भारत ब्राझीलशी स्पर्धा करत आहे, असे सांगितले जाते. मात्र इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्यात ब्राझील भारताच्या खूप पुढे आहे. ब्राझीलमध्ये 4 बिलियन गॅलन इथेनॉल उत्पादित केले जाते. ते 100 टक्के शुद्ध इथेनॉल 40 टक्के कारमध्ये वापरले जाते. ब्राझीलने 24 टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये वापरून इंधन आयातीची गरज खूप कमी केली आहे. सुमारे 2.65 बिलियन लिटर अल्कोहोलची निर्मिती 10 ते 10 मिलियन टन मोलॅसिसपासून केली जाते. सध्या मोलॅसिसच्या भावाने 50 हजार रुपयांचा टप्पा
केव्हाच पार केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 55 रुपये लिटर
जागतिक बाजारपेठेत पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की हा तोटा महागाईच्या आगडोंबात पेट्रोल दरवाढीचे तेल ओतून लोकांच्या खिशाला चाट देत वसूल केला जातो. पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी पुरेसे इथेनॉल तयार करण्याची क्षमता आपल्या शेतीप्रधान देशात असताना फक्त 5 टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रणाचा निर्णय वास्तवात येऊ शकला नाही. सौमित्र चौधरी यांच्या समितीची इथेनॉलला 31 रुपये भाव द्यावा ही शिफारसही कालबाह्य ठरली आहे. कारण इथेनॉलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 50 ते 55 रुपये लिटरवर पोचले आहेत. तरी इथेनॉलला योग्य भाव देऊन देशाला योग्य दरात इंधन उपलब्ध करून देता येईल हे त्रिवार सत्य आहे.

उसाला चांगला दर मिळेल, पेट्रोलही स्वस्त होईल
2003 मध्ये केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या काळात पेट्रोलमध्ये 5 टक्के इथेनॉल मिसळण्याचा व त्यामध्ये दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. याप्रमाणे सद्य:स्थितीला पेट्रोलमध्ये सुमारे 25 टक्के इथेनॉल मिसळणे अपेक्षित होते. मात्र शासनाच्या इथेनॉलबाबतच्या उदासीनतेने या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. जर इथेनॉलला भरघोस दर मिळाला तर साखर कारखाने इथेनॉल निर्मितीकडे आकर्षित होऊन शेतक-यांच्या उसाला चांगला दर देण्याबरोबरच पेट्रोल स्वस्त ठेवल्याने वाहनधारकाला त्याचा फायदा होईल. त्याबरोबर परकीय चलनात घट होईल. त्याकरिता केंद्र सरकारने यावर गंभीर विचार करून सोयी-सवलती देत इथेनॉल उद्योगाला प्रोत्साहित करायला पाहिजे.
पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी