आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जिकल स्ट्राइकसाठी नव्या पर्यायांचा विचार- लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करण्यास लष्कर सज्ज अाहे. मात्र, नेहमीच्या पध्दतीने सर्जिकल स्ट्राइक न करता नवीन पर्यायांचा विचार करण्यात येत असल्याचे सूतोवाच लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केला आहे. 


 राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक व पत्रकार नितीन गाेखले यांच्या ‘सिक्युरिंग इंडिया-द माेदी वे’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी वायुदलप्रमुख पी.व्ही.नाईक, लष्कराचे दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी.अार.साेनी, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे संचालक प्रशांत गिरबने उपस्थित हाेते. संरक्षण विभागाच्या मुख्य नियंत्रक लेखा विभागाच्या वतीने लष्करी अधिकारी व जवान यांच्यासाठी ‘डेफाेडील’या स्वयंचलित दूरध्वनी संपर्क यंत्रणा लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या हस्ते शुक्रवारी सुरु करण्यात अाली. त्यावेळी रावत म्हणले,  सुमारे १ लाख ४० हजार जवानांच्या रखडलेल्या पदोन्नतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल आणि ४३८ नायब सुभेदारांची भरती केली जाईल.  डेफाेडील यंत्रणेमुळे वेतना संदर्भातील समस्यांसाठी प्रत्यक्ष लेखा विभागात येण्याची गरज अाता राहणार नाही. सदर यंत्रणा इंटरनेटविना २४ तास सुरू राहील. सीमेवर किंवा दुर्गम भागात असलेल्या सैनिकांना दूरध्वनीच्या माध्यमातून वेतन 
अाणि भत्ते यासंदर्भातील सविस्तर माहिती मिळणार असून सदर यंत्रणा सुरक्षित अाहे.  

बातम्या आणखी आहेत...