आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सबनीसांकडे, पुरस्कार वापसीचे समर्थन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पिंपरी येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक, लेखक डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड झाली. निवडीनंतर काही वेळातच त्यांनी असहिष्णुतेविरुद्ध लेखकांनी सुरू केलेल्या ‘पुरस्कार वापसी’ला पाठिंबा दिला.

असहिष्णुतेविरुद्ध लेखक, विचारवंत, कलाकार, वैज्ञानिक त्यांना मिळालेले पुरस्कार परत करत आहेत, त्याबाबत तुमची भूमिका काय, असे विचारले असता सबनीस म्हणाले की, सध्याच्या असहिष्णू वातावरणाचे कोणताही बुद्धिप्रामाण्यवादी समर्थन करणार नाही. असहिष्णुतेविरोधात ज्यांनी पुरस्कार परत केले, त्यांना माझा पाठिंबा आहे. या निवडणुकीत सबनीसांना १०३३ मतांपैकी सर्वाधिक ४८५ मते मिळाली. विठ्ठल वाघ यांना ३७३, अरुण जाखडेंना २३०, शरणकुमार लिंबाळेंना २५ तर श्रीनिवास वारुंजीकर यांना २ मते मिळाली. सबनीस हे मूळचे लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील हाडाेळीचे अाहेत.
राज्याचा सांस्कृतिक नकाशा जोडण्याचे आव्हानच
पिंपरी येथे हाेणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी झालेली निवड आनंददायक आहेच, पण महाराष्ट्राचा सांस्कृतिक नकाशा जोडण्याचे आव्हान समोर आहे, असे मनोगत नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना मांडले.

मुळ मराठवाड्यातील असलेल्या सबनीस यांना अध्यक्षपदाचा मिळाला. सुरुवातीलाच महाराष्ट्रातील १२ कोटी मराठी भाषकांचे आणि बृहन्महाराष्ट्रातील मराठी मंडळींचे आभार मानून सबनीस यांनी ज्येष्ठ समीक्षक नरहर कुरुंदकर यांना वंदन केले. ‘संत परंपरा, सुधारकांची परंपरा आणि क्रांती परंपरेला मी अभिवादन करतो, असे सांगून ते म्हणाले,“माझा विजय या परंपरेचा विजय आहे, असे मी मानतो. आज धर्मवाद, धर्मउन्मादवाद, पुरस्कारवापसी असे अनेक प्रश्न आहेत. या साऱ्यांबाबत साहित्यिकांची एक जबाबदारी निश्चितच आहे. समाजाच्या वेदनेच्या बांधिलकीचे सूत्र साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मांडणे मला महत्त्वाचे वाटते. शब्दांशी, वेदनेशी मी शंभर टक्के प्रामाणिक राहू इच्छितो. संघर्षांचे मोल मी जाणतो, पण संघर्षापेक्षाही संवादाला मी अधिक महत्त्व देतो, तोच माझा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.
सबनीस यांचे साहित्यिक कार्य
पुरस्कार पुणे विद्यापीठ संत नामदेव अध्यासनाचा स्वामी स्वरुपानंद सरस्वती
डी. बी कोसंबी पुरस्कार
पुणे मराठी ग्रंथालय : न. चिं केळकर
स्वातंत्र्यसेनानी चारठाणकर पुरस्कार
आदर्श शिक्षक पुरस्कार : महाराष्ट्र शासन
यूजीसीचे रिसर्च अॅवॉर्ड
प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार
मनोहर स्मृती पुरसाकर साहित्य साधना
जाणीव पुरस्कार
तीन हजारांहून अधिक व्याख्याने
ललित लेखन : मुक्तक, उपेक्षितांची पहाट, जीव रंगला रंगात
संपादित ग्रंथ : फं मं शहाजिंदे यांची निवडक कविता, संस्कृती स्पंदनाचा मराठी आलेख, महाराष्ट्राच्या इतिहासातील स्त्रियांचे योगदान, प्रबोधनपर्व
(प्रा. विलास वाघ यांचा गौरवग्रंथ)
नाटक : शुक्राची चांदणी, मुंबईला घेऊन चला
एकांकिका : सत्यकथा ८२, क्रांती, कॉलेज कार्नर
अनेक पुस्तकांचे केले लेखन
ज्ञानेश्वर ते आंबेडकर, सेक्यूलर वाड्मयीन अनुबंध,ब्राह्मणी सत्यशोधकाचे अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र, भारतीय प्रबोधन आणि नव आंबेडकरवाद, संस्कृती समीक्षेची तिसरी भूमिका, सेक्यूलॅरिझम - प्रबोधनाचा मानदंड, परिवर्तनवादी प्रवाहाचीतौलनिक समीक्षा, साने गुरुजी विचार जागर, ब्राह्मणी सत्यशोधक, उगवतीचा क्रांतीसूर्य, भारतरत्न आणि बहिष्कृत भारत, संत नामदेव तुकारामांचे सांस्कृतिक संचित,नारायण सुर्व्यांच्या कवितेची इत्यादी समीक्षा, संत साहित्यातील सेक्यूलॅरिझम, समतोल समीक्षा, इहवादी संस्कृती शोध, आदीवासी, मुस्लीम, खिश्चन साहित्य मिमांसा, विद्रोही अनुबंध, कलासंचित, बृहन्महाराष्ट्राचे वाड्मयीन संचित, नामदेवांचे संतत्व आमि कवित्व.
बातम्या आणखी आहेत...