आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर तुम्ही सुद्धा!, पुण्यात मनोरुग्ण तरुणीवर वॉर्डबॉयकडून बलात्कार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - देशाच्या वेगवेगळ्या भागातून रोज बलात्काराच्या घटना समोर येत असताना सेलिब्रिटीपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्व जण एकच प्रश्न उपस्थित करीत आहेत की, समाजाची नैतिकता कुठे हरवली आहे ? संवेदनशील समाज राहिलाच नाही का ? असे असताना पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये बलात्काराचा प्रकार घडल्यानंतर डॉक्टर दांम्पत्याने प्रकरण दडपण्यासाठी पैशाची मागणी करून डॉक्टरी पेशाला काळीमा फासला आहे.

पुण्यातील सुयश हॉस्पिटलमध्ये काही महिन्यांपासून उपचार घेत असलेल्या 22 वर्षीय मतिमंद तरुणीवर तेथील वॉर्डबॉय सुभाष मोदड (वय 21) याने नाईटड्युटी असताना बलात्कार केला. हॉस्पिटलमध्ये या घटनेची चर्चा सुरू झाल्यानंतर हॉस्पिटलची बदनामी होऊ नये यासाठी मुलीच्या नातेवाईकांना हॉस्पिटलचा खर्च माफ करतो, मोफत उपचार करतो असे आमिष देऊन डॉ. विशाल सोनवणे याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.
त्याचवेळी डॉ. सोनवणे आणि त्याची पत्नी डॉ. वर्षाने वॉर्डबॉय सुभाषला हॉस्पिटलमधील एका खोलीत डांबून ठेवले आणि त्याला सोडण्यासाठी त्याच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी केली. डॉक्टरांनी मागणी केलेले पैसे देण्याची ऐपत नसल्याने सुभाषच्या नातेवाईकांनी स्थानिक नगरसेविका उबाळे यांना या प्रकारणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने वॉर्डबॉय सुभाषला डॉ. सोनवणेच्या तावडीतून सोडवण्यात आले आणि बलात्काराचा प्रकारही समोर आला आहे.
या प्रकरणी वॉर्डबॉय सुभाष मोदड याला बलात्काराच्या आरोपात अटक करण्यात आली आहे तर, डॉ. विशाल सोनवणे (वय 36) आणि त्याची पत्नी डॉ. वर्षा सोनवणे (32) यांनाही अटक झाली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची तर, वॉर्डबॉयला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

डॉ. सोनवणे दाम्पत्याने हॉस्पिटलच्या बदनामीच्या भीतीने प्रकरण दडपले की, त्यांचा काही वेगळाच हेतू होता हे पोलिस तपासात समोर येईलच पण, या घटनेमुळे डॉक्टर तुम्ही सुद्धा ! असे म्हणण्याची वेळ आली आहे.