आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षभरानंतर दाभाेलकरांच्या खुन्यांची CBI कडून नवी रेखाचित्रे, तपासावर कुटुंबीय नाराज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) हस्तांतरित झाल्यानंतर तब्बल एका वर्षांनतर या प्रकरणातील दोन संशयित मारेकऱ्यांची रेखाचित्रे बुधवारी जारी करण्यात अाली.

दरम्यान, संथगतीने सुरू असलेल्या सीबीअाय तपासावर डाॅ. दाभाेलकर कुटुंबीय नाराज असून या प्रकरणाचा तपास लवकर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

डाॅ. नरेंद्र दाभाेलकरांची पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ पुलावर २० अाॅगस्ट २०१३ राेजी दाेन मारेकऱ्यांनी गाेळ्या झाडून हत्या केली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी २५ पथकांच्या मदतीने मारेकऱ्यांचा शाेध घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी राज्यातील सराईत गुन्हेगार, सुपारी किलर, कारागृहातील कैदी, बंदूक विक्रेते आणि इतरांकडे चौकशी करण्यात आली.
११ लाखांचे इनाम
पहिले रेखाचित्र दुचाकीचालक व गाेळी झाडणाऱ्याचे, तर छायाचित्र दुसरे दुचाकीवरील मागच्या आरोपीचे आहे. त्यांची माहिती देणाऱ्यास एकूण ११ लाखांचे बक्षीस आहे.
बातम्या आणखी आहेत...