आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Syllabus For Executive And Professional Programmers Icsi

'आयसीएसआय'च्या नवीन अभ्यासक्रमाची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कंपनी सेक्रेटरी पदासाठी नवा अभ्यासक्रम अमलात येत असल्याची घोषणा इन्स्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे ( आय सी एस आय ) अध्यक्ष एस. एन. अनंत सुब्रमण्यम यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

जागतिक दृष्टीकोन आणि सध्याची बदलती परिस्थिती लक्षात घेऊन नवा अभ्यासक्रम आय सी एस आयच्या कार्यकारी मंडळाने अमलात आणण्याचे ठरविले आहे असे नमूद ते म्हणाले की संस्थेच्या संकेतस्थळावर अभ्यास साहित्याचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑन ला ईन नोंदणी करता येणार असून ऑन ला ईन परीक्षा देत येइल. त्यासाठी नव्या तंत्राचा वापर आणि शंकाचे ई निरसन केले जाणार आहे. अभ्यास झाल्यानंतर त्यांची किती तयारी झाली हे तपासणारी यंत्रणाही राबविली जाते आहे.

कायदा सल्ला देणाऱ्या फर्म, आर्थिक शिक्षण देणारी महाविद्यालये , विविध कंपन्यांचे रजिस्ट्रार यांच्यासोबत प्रशिक्षण घेण्याचा अनुभव आम्ही मिशन २०२० नुसार देणार आहोत www.icsi.edu या संकेतस्थळावर प्रवेश, परीक्षा यासाठी नोंदणी करता येईल तसेच पैसे भरता येतील. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना मदतीसाठी स्वतन्त्र निधी स्तःपण करण्यात आला आहे. तसेच प्लेसमेंट व्हावी यासाठी संस्था प्रयत्न करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.