आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Technology For Sugar Industries Says Devendra Fadnavis

साखर उद्योगासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज : सीएम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - साखर उद्योगाचे प्रश्न सोडवण्यासाठी पाच ते दहा वर्षांचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यासाठी लवकरच साखर महासंघ व साखर उद्योगातील तज्ज्ञांची बैठक घेऊन मार्ग काढला जाणार आहे. साखर उद्योगाला गती देण्यासाठी नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कार्यकमात बोलत होते.

या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. फडणवीस म्हणाले, राज्यातील साखर उद्योगापुढील अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन या उद्योगाच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. उसाच्या पिकासाठी ठिबक सिंचन पद्धती बंधनकारक करण्यात येत आहे.

साखर उद्योग सध्या अडचणीत
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार म्हणाले, साखर उद्योग सध्या अडचणीच्या काळातून जात आहे. साखरेचा उत्पादन खर्च व विक्रीचा दर यामध्ये साधारणपणे ७०० रुपयांची तफावत असून एफआरपीप्रमाणे दर देण्याची कायदेशीर जबाबदारी कारखान्यांची आहे. या उद्योगापुढील अडचणी सोडवण्यासाठी संबंधितांची बैठक घेऊन ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे, असे सांगत त्यांनी इथेनॉल, सहवीजनिर्मिती, एकमेकांविरोधात उभे राहणार्‍या आयकर, कर्जे व पाण्याच्या प्रश्नांबाबत विविध अडचणी स्पष्ट केल्या.