आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओशो आश्रमात असे झाले न्यू इयर सेलिब्रेशन, प्रवेशापूर्वी HIV टेस्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आचार्य रजनीश ओशोंच्‍या पुण्‍यातील आश्रमात नवीन वर्षाचे उत्‍साहात स्‍वागत करण्‍यात आले. यामध्‍ये ओशोंचे देश विदेशातील जवळपास 5 हजार अनुयायी सहभागी झाले होते. 31 डिसेंबरला रात्री 10 वाजता पार्टी सुरू झाली. ती 1 जानेवारीच्‍या सकाळी 5 चाचली. यात अनुयायांनी डीजेच्‍या तालावर मनसोक्‍त नृत्‍य केले.
काय होते खास?
- या वर्षी न्यू ईयर सेलिब्रेशन 'ओसियन एक्सपीरियंस' थीमला अनुसरून आयोजित केले होते.
- पूर्ण आश्रमला फ्लोरोसेंटला निळ्या रंगाच्‍या लाइट्सने सजवले.
- 12 वाजता आकाशात आतिशबाजी केली गेली.
- अॅक्टिविटी हॉलमध्‍ये डीजेच्‍या तालावर डान्‍स पार्टीचे आयोजन केले गेले होते.
- आश्रमाच्‍या स्विमिंग पुलावर निळ्या रंगाचे लाइट्स टाकून त्‍याला ओसियन (समुद्र) लुक देण्‍याचा प्रयत्‍न केला गेला होता.
- काही लोकांनी तलावातही पार्टी केली.
- स्पेशल डिनर पार्टीसोबत मेडिटेशन सेशनही होते.
- या सेलिब्रेशनला ड्रेस कोड लागू नव्‍हता.
- पार्टीदरम्‍यान ड्रिंक्सवर बंदी होती.
आतून खूप आकर्षक आहे आश्रम
आपल्‍या विनधास्‍त आणि स्पष्ट विचारांमुळे ओशो कायम चर्चेत राहिलेत. त्‍यांच्‍या विचाराप्रमाणेच पुण्‍यातील कोरेगाव पार्क परिसरातील 28 एकर जागेत त्‍यांचा आश्रम आहे. 1974 मध्‍ये तो बांधण्‍यात आला. या ठिकाणी नैसर्गिक वातावरणाला आधुनिकतेची जोड देण्‍यात आलेली आहे. आत गवताचे गालीचे, संगमवर दगडाचे नक्षीकाम, काळ्या रंगात बांधलेली आकर्षक इमारत, पाण्‍याचे कृत्रिम झरे, चहुकडे हिरवळ, गार हवा, ओलिंपिक साइजचे स्विमिंग पूल आणि जवळपास बसलेले विदेशी अनुयायी दिसतात. आश्रमातील हे देखावे कुणाच्‍याही मनाला हवेहवेसे वाटतात.
प्रवेशापूर्वी एचआयव्‍ही एड्स चाचणी सक्‍तीची
या आश्रमात प्रवेश करण्‍यापूर्वी मुख्‍य गेटवर असलेल्‍या रिसेप्शन सेंटरवर 1500 रुपये शुल्‍क भरून आत जाण्‍यासाठी नोंदणी करावी लागते. नंतर नोंदणी केलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या एचआयव्‍ही चाचणीसाठी ब्लडचे सँपल घेतले जाते. त्‍यानंतरच तिला आश्रमात प्रवेश दिला जातो. यासाठी विशिष्‍ट्य ओळखपत्र दिले जाते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा पार्टीचे फोटोज...