आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओवेसी म्हणाले; नोटाबंदीचा त्रास गरिबांनाच, मोदी सरकारच्या निर्णयामुळेच पुण्यात बालिकेचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद/पुणे- मोदी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय अयोग्य असून हा निर्णय आता गरीब जनतेच्या जीवावर उठला असल्याची टिका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. ओवेसींनी सांगितले की, मोदींनी नोटाबंदीचा निर्णयानंतर हॉस्पिटलमध्ये जुन्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. देशात नोटाबंदीच्या निर्णयानंतर 50 हून अधिक बळी गेले आहेत. मोदींनी नोटाबंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी ओवेसींनी केली आहे.

रुबी हॉस्पिटलमधील घटना मोदी सरकारच्या निर्णयाचाच परिणाम....
पुण्यात रुबी हॉस्पिटलच्या आडमुठेपणामुळे एका नवजात बाळाला जीव गमवावा लागला आहे. ही घटना म्हणजे मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचाच परिणाम असल्याचे ओवेसींनी म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत येणार आहे, अशी टीकाही ओवेसींनी केली आहे. नोटाबंदीमुळे भारताचा विकासदर घसरेल आणि चीन भारताच्या पुढे निघून जाईल, अशी भीतीही ओवेसींनी व्यक्त केली.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांची लग्न रखडली आहेत, तर अनेकांची लग्न पुढे ढकलण्यात आली आहेत. जगात नोटाबंदीचा प्रयोग यशस्वी झालेला नाही.

पुढील स्लाइडवर वाचा....रोख रकमेअभावी नवजात बालिकेचा मृत्यू; पुण्यात रुबी हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार
बातम्या आणखी आहेत...