आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राेख रकमेच्या अाग्रहामुळे बालिकेच्या मृत्यूचा अाराेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - रुग्णालयाने हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप रविवारी पुण्यात बालिकेच्या नातेवाइकांनी केला. या असंवेदनशीलतेमुळे रुबी हाॅल क्लिनिक या रुग्णालयाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

पुण्यातील आम्रपाली आणि गौरव खुंटे या दांपत्याला शुक्रवारी केईएम रुग्णालयात मुलगी झाली. मात्र, बाळाला हृदयाला त्रास असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचासल्ला दिला. त्यावर रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांनी केईएम येथे येऊन तपासणी केली. शस्त्रक्रियेसाठी साडेतीन लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात अाले. तसेच सर्व रक्कम रोखीने भरण्याचेही रुग्णालयाने स्पष्ट केले. हजार, पाचशेच्या नोटा बंद झाल्यामुळे पैसे मिळवणे अवघड जात असले तरी खुंटे कुटुंबीयांनी तातडीने दीड लाख रुपये राेख भरले. तसेच उर्वरित रक्कम आॅनलाइन भरण्याची तयारी दाखवली, परंतु रुबी हॉलने सर्व रोख रक्कम भरल्यानंतरच शस्त्रक्रिया केली जाईल, असे सांगितले.

पैशांच्या कारणावरून रुग्णालय प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे बराच काळ गेला. जागा नसल्याने बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यास असमर्थता दाखवली. दरम्यान, बाळाचे अवयव निकामी होत गेले. शुक्रवारी जन्मलेल्या बाळावर तत्काळ शस्त्रक्रिया करणे अावश्यक होते. मात्र, वेळेत शस्त्रक्रिया न केल्याने रविवारी पहाटे बाळ दगावले, असा नातलगांचा अाराेप अाहे.

राेख रकमेसाठी रुग्णालयाचा हट्ट : सराेदे
मुलीचे नातेवाईक कुणाल सरोदे यांनी सांगितले, की ‘रुबी’च्या डॉक्टरांनी साडेतीन लाख रुपये रोख स्वरुपात जमा झाल्याशिवाय शस्त्रक्रिया करणार नसल्याचे सांगितले. आम्ही दीड लाख रुपये हजार रुपयांच्या राेख स्वरुपात जमा केले. उर्वरित रक्कम आॅनलाइन भरणार असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी सर्व रक्कम रोख भरण्याची मागणी केली. त्यावर आम्ही धनादेशाच्या स्वरुपात रक्कम देऊ केली. रुग्णालयाने धनादेश घेण्यास नकार दिला.’

बाळ रुग्णालयात अाणलेच नव्हते : रुग्णालय प्रशासन
‘रुबी’च्या वैद्यकीय सेवेचे संचालक डॉ. संजय पठारे म्हणाले, की खुंटेंच्या बालिकेला रुबी हॉलमध्ये अाणलेच नव्हते. नातेवाइकांनी रुग्णालयाच्या अधिकृत अधिकाऱ्यांशी संपर्कही साधला नाही. अनधिकृत व्यक्तीच्या माहितीमुळे त्यांना पैसे जमा करण्यात व उपचारास विलंब झाला. सायंकाळी बाळ शस्त्रक्रियेसाठी फीट नव्हते. नातेवाइकांनी रुग्णालयाशी सायंकाळी सात वाजल्यानंतर संपर्क साधला होता. त्यामुळे रुग्णालयावरील आरोप चुकीचे आहेत.
बातम्या आणखी आहेत...