आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहेरी आलेल्या नवविवाहीतेची एक्स-बॉयफ्रेंडने केली निर्घृण हत्या; जंंगलात फेकला मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा/पुणे- सातारा जिल्ह्यातील चिंचनेर येथे एका नवविवाहीतेचा मृतदेह सापडला आहे. महिलेचे हत्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडने केल्याचे उघडकीस आले आहे. ती लग्नानंतर तीन महिन्यांनी माहेरी आली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. दुसरीकडे, मृत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी आरोपीच्या वस्तीत जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. जमावाने अनेक वाहने पेटवून दिल्याने गावात तणाव पसरला आहे.

काय आहे हे प्रकरण..?
- चिंचनेर येथील अरुणाचा तीन महिन्यांपूर्वी बारामती येथील दत्तात्रय मोहीतेसोबत विवाह झाला होता.
-विवाहापूर्वी अरुणाचे चिंचनेर येथील रहिवासी सिद्धार्थ दणणे (24) या प्रेमसंबंत होते.
-विवाहानंतर अरुणाने सिद्धार्थसोबत संभाषण बंद केले होते. याचा त्याला राग आला होता. त्याने तिला भेटायला बोलवले होते.
-पण अरुणा, सिद्धार्थला टाळत होती. 'तुझ्या पती सर्वकाही सांगेल', अशी भमकीही त्याने अरुणाला दिली होती.
- सिद्धार्थच्या धमकीला घाबरुन अरुणा पतीला काहीही न सांगता 30 नोव्हेंबरला बारामतीहून सातार्‍याला आली.
- पतीने तिला अनेकदा फोन करून पाहिला. पण तिचा फोन स्वीच ऑफ येत होता.
-दत्तात्रय याने दुसर्‍या दिवशी बारामतीमधील वडगांव निंबालकर पोलिस ठाण्यात अरुणा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
- दुसरीकडे, चिचंनेर येथे पोहोचलेल्या अरुणाला सिद्धार्थ घराजवळीत जंगलात घेऊन गेला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
-सिद्धार्थने संतापाच्या भरात अरुणाच्या डोक्यात दांडुका मारला. अरुणा रक्तभंबाळ होऊन जमिनीवर कोसळली. तिचा मृत्यू झाला.
- सिद्धार्थ तिचा मृतदेह जंगलात फेकून गावात‍ परतला.

- दुसरीकडे, पोलिस बेपत्ता अरुणाचा शोध घेत होते.
-पोलिसांनी अरुणाच्या फोनवरील कॉल रिकॉर्डची माहिती घेतली असता सिद्धार्थ मागील काही दिवसांपासून तिच्या संपर्कात असल्याचे दिसून आले.
- पोलिसांनी त्याला चिचंनेर येथे जाऊन अटक केले.
- पोलिसांसमोर त्याने गुन्हा कबूल केला.

अरुणाच्या नातेवाईकांनी आरोपीच्या वस्तीत केली जाळपोळ
-अरुणा आणि आरोपी सिद्धार्थ एकाच गावात राहात होते. दोघांंमध्ये प्रेमसंंबंंध होते. तिचे दुसर्‍या तरुणासोबत विवाह झाल्याने सिद्धार्थ बिथरला होता. तो अरुणाला सारखा धमकावत होता. त्याचे तिची निर्घृण हत्या केल्याचे समजताच तिच्या नातेवाईकांनी आरोपीच्या वस्तीवर हल्लाबोल केला. तोडफोड केली. अनेक वाहने पेटवून देेण्यात आले.
- यात दोन दुचाकीसह चार कारचा समावेश आहे.
- पोलिसांनी 30 जणांना अटक केले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, मृत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी आरोपीच्या वस्तीत केलेल्या जाळपोळीचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...