आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी संवर्धनासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी देणार : पाटील यांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मराठी भाषेच्या संवर्धन आणि संशोधनासाठी तीन संमेलनाध्यक्षांना १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी शुक्रवारी केली आहे.

घुमान येथे झालेल्या ८८ व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, अंदमान येथे झालेल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शेषराव मोरे आणि पिंपरी-चिंचवड येथे भरणाऱ्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे हा निधी देण्यात येणार असल्याचे डाॅ. पाटील यांनी स्पष्ट केले.हा निधी वैयक्तिक स्वरूपाचा नसून मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे देण्यात येणार आहे. त्याचा विनियोग कसा करायचा याचे स्वरूप लवकरच ठरवण्यात येईल. यातून मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संशोधन व इतिहास जतन करण्यासाठी काही भरीव काम होईल, असे डॉ. पाटील म्हणाले.