आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववीत 20 मार्कांचे गुणदान बंद, पेपर 100 गुणांचा; दहावीत अंतर्गत गुणांची खिरापत वर्षापुरतीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पुणे- दहावीतील गुणांच्या वाढत्या टक्केवारीबद्दलची चर्चा सुरू झाल्यावर शाळांच्या  अखत्यारीत ‘तोंडी’तील गुणांच्या  खिरापतीला अाता चाप लागणार अाहे. 
 
या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने यंदाच्या वर्षीपासूनच नववीला भाषा विषयांची तोंडी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी शंभर गुणांचा पेपर द्यावा लागेल. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय दहावीलाही लागू होऊ शकतो.
 
राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी परिपत्रकाद्वारे हा आदेश शाळांना कळवला आहे. त्यानुसार ८० गुणांची लेखी परीक्षा आणि २० गुणांची तोंडी परीक्षा हा सध्याच्या पॅटर्न  रद्द झाला असून, अाता शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच सामाजिक शास्त्र या अंतर्गत येणाऱ्या इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांसाठी  व्यवसाय शिक्षण हा पर्याय देण्यात आला आहे. चालू वर्षापासून नववीला हे बदल लागू होतील. दहावीच्या विद्यार्थ्यांना या वर्षापुरते २० मार्काचे गुणदान कायम   राहिल, असे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.  
 
व्यवसाय शिक्षणाचा पर्याय
व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमासाठी नववीसाठी दहा पर्याय आहेत. मूल्यमापनातही बदल करण्यात आले आहेत. त्यात ७० टक्के गुण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी तर ३० टक्के गुण लेखी परीक्षेसाठी असतील.
- गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ
बातम्या आणखी आहेत...