ज्ञानाेबा-तुकाेबा साहित्यनगरी, पिंपरी - संमेलनातील वैशिष्ट्य असते ते म्हणजे माजी संमेलनाध्यक्षांचा सत्कार. यात माजी संमेलनाध्यक्षांचा सत्कार हाेणार त्यांची नावे कार्यक्रम पत्रिकेतच देण्यात अाली हाेती. मात्र माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांचे त्यात नाव नसल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये तसेच उपस्थितांमध्ये त्यांना अायाेजक विसरले की काय? अशी चर्चा चांगलीच रंगली.
पिपरी येथे सुरू असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनादरम्यान माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते माजी संमेलनाध्यक्षांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. यात ११ संमेलनाध्यक्ष अाणि तीन विश्व साहित्य संमेलनाध्यक्षांचे नाव निमंत्रण पत्रिकेत प्रसिद्धही करण्यात अाले हाेते. मात्र ठाणे येथे झालेल्या साहित्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांचे त्यात नाव नसल्याने अनेकांनी अाश्चर्य व्यक्त केले. कांबळेंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांमध्ये तशी चर्चाही हाेत हाेती. मात्र कांबळे सरांकडे अाधीच एक कार्यक्रम असल्याचे अायाेजकांनी सांगितले.
त्यांना दुसरा कार्यक्रम हाेता
संमेलनाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व माजी अध्यक्षांना रितसर निमंत्रण दिले हाेते. त्यावेळी पूर्वनियाेजित कार्यक्रमामुळे सत्काराला उपस्थित राहणे शक्य नसल्याचे उत्तम कांबळे यांनी पत्राद्वारे कळविले हाेते. इतरही काही माजी संमेलनाध्यक्षांनी याच प्रकारे उपस्थित राहणे अशक्य असल्याचे सांगितले. म्हणून ्यांच नावे कार्यक्रमपत्रिकेत नाहीत. ज्यांचे येणे नक्की हाेते त्यांचीच नावे पत्रिकेत छापली.
सचिन इटकर, संयाेजक, साहित्य संमेलन, पिंपरी
मी बाहेरगावी हाेताे
मला निमंत्रण अाले हाेते. पण मी त्याच तारखेला मुंबईत एका दुसऱ्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यावेळी उपस्थित रहाणे शक्य नव्हते. तसेच परभणीचाही एक कार्यक्रम मी अाधीच घेतल्यामुळे मी संमेलनाला उपस्थित राहू शकत नसल्याची कल्पना मी पिंपरीतील संमेलनाच्या अायाेजकांना अाधीच दिलेली हाेती.
उत्तम कांबळे, माजी संमेलनाध्यक्ष
पाडगावकरांची गैरहजेरी चटका लावणारी
माजी संमेलनाध्यक्षांच्या सत्कारात मंगेश पाडगावकर यांचेही नाव हाेते. विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पाडगाकरांन भूषविले हाेते. संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेत पाडगावरांचेही नाव हाेते. मात्र अाता पाडगावकर अापल्यात नाहीत. त्यामुळे कार्यक्रम पत्रिकेतील नावाची उपस्थिती अाणि कार्यक्रमाला पाडगावरांची अनुपस्थिती साहित्य रसिकांच्या मनाला चटका लाऊन गेली.
यांची नावे पत्रिकेत मात्र गैरहजर
प्रा. के. ज. पुराेहित, प्रा. द. मा. मिरासदार, डाॅ. विजया राजाध्यक्ष, राजेंद्र बनहट्टी, प्रा. रा. ग. जाधव, प्रा. वसंत अाबाजी डहाके